शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीच्या स्फोटात घराची राखरांगोळी

By admin | Updated: June 13, 2014 19:04 IST

विजेच्या कडकडाटामुळे घडला प्रकार

वल्लभनगर : विजेच्या कडकडाटामध्ये इलेक्ट्रानिक उपकरणे चालू ठेवल्यामुळे घरातच टीव्हीचा स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार निंभोरा येथे १२ तारखेच्या रात्री दहा वाजता घडला. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले असून, भूमिहीन कुटुंब रस्त्यावर आले आहे. निंभोरा येथे तेजराव बघे यांचे कुटुंब राहते. मोलमजुरी करू न आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणार्‍या तेजराव बघे यांनी घरात धान्य साठवून ठेवले होते; परंतु अचानक घडलेल्या या प्रकाराने घरातील टीव्हीचा जोरदार स्फोट झाला. यावेळी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे घराने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा मोठ्या असल्यामुळे वेळीच आग आटोक्यात आणण्यात अडथळा होत होता. या आगीमध्ये बघे यांच्या घरातील गहू पाच पोते, तूर, हरभरा, दाळ, कपडे व मजुरीची जमा केलेली २५ हजार रोख रक्कम जळून खाक झाली. गावकर्‍यांनी प्रयत्न केल्यामुळे आग आटोक्यात आली. गावातील रमेश श्रीनाथ यांनी वीज प्रवाह खंडित केला. गावातील बाळकृष्ण बिल्लेवार, भास्कर बिल्लेवार, तुळशिराम सुलताने, शामराव इंदोरे, साहेबराव पाखरे यांच्यासह गावकर्‍यांनी आग विझविण्यास मदत केली. तेजराव बघे यांच्या घरातील एकही वस्तू शिल्लक राहिली नसल्यामुळे या कुटुंबावरआता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. समाजातील दानशूर लोकांनी या परिवारास मदत करावी, अशी मागणी होत आहे.