शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन तेलबिया पिकांचा आता शेतकर्‍यांना आधार!

By admin | Updated: July 21, 2014 00:42 IST

यावर्षी खरीप हंगामासाठी सूर्यफूल, तीळ पिकांचे नियोजन

अकोला : यंदा पावसाळा लांबल्याने अनेक शेतकर्‍यांना अर्धरब्बीतील तेलबिया पिकांचा आधार वाटत असून, त्यासाठी सूर्यफूल व तीळ या बियाण्यांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी राज्यात सर्वत्र पावसाला विलंब झाला आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्याची आता कुठे सुरुवात झाली आहे. यापुढे पिकांना लागणारा पाऊस आणि हवामान अनुकूल मिळाले, असे हमखास कुणीच सांगायला तयार नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन पेरणीबाबत आवरता हात घेतला आहे. सोयाबीन शंभर दिवसांचे पीक आहे. आता पेरणी केल्यास हे पीक ऑक्टोबरच्या शेवटपर्यंंत शेतात राहील. पावसाळा मात्र ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात संपतो. पुढे या पिकाला संरक्षित ओलिताची गरज लागणार आहे. त्यामुळे सोयाबीनचे क्षेत्र ५0 टक्कय़ांनी कमी करू न या क्षेत्रावर उशिरा येणार्‍या पिकांचे शेतकर्‍यांनी नियोजन करण्यास हरकत नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सूर्यफूल आणि तीळ ही उशिरा घेता येण्यासारखी तेलबिया पिकं आहेत. १५ ऑगस्टपर्यंंत या पिकांच्या पेरणीचा कालावधी आहे. आपात्कालीन परिस्थितीत सूर्यफूल -तूर (२:१), तीळ -तूर (४:१) हे आंतरपीक प्रयोगाअंती सिद्ध झाल्याने या पद्धतीने या पिकांची पेरणी करावी, असे तेलबिया संशोधकांनी म्हटले आहे. सूर्यफुलात सरळ व संकरित वाण उपलब्ध आहेत. संकरित वाणाचे उत्पादन जास्त मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांचा कल या बियाण्यांकडे अधिक आहे. संकरित वाण पारंपरिक क्षेत्रासाठी दरवर्षी उपलब्ध असल्याने शेतकर्‍यांना बाजारातील संकरित वाणाची निवड करावी लागणार आहे. सूर्यफुलाचे टीएएस-८२,पीकेव्हीएसएफ ९ हे शुद्ध तर संकरित वाणामध्ये पीकेव्ही एसएच २७, केबीएसच १, केबीएसएच ४४, तसेच खासगी कंपन्याचे वाण उपलब्ध आहे. तीळाचीसुद्धा या आपात्कालीन परिस्थितीत उथळ काळ्य़ा व निचर्‍याच्या जमिनीत १५ ऑगस्टपर्यंंत पेरणी करावी लागणार आहे. एकेटी ६४, जेएलटी-७ किंवा पांढर्‍या तिळाचे खासगी कंपन्याचे वाण उपलब्ध आहेत. दरम्यान, पेरणी करताना शेतकर्‍यांना या बियाण्यांना बीजप्रकिया करावी लागणार असून, उगवणशक्ती तपासावी लागणार आहे. या परिस्थितीत शेतकर्‍यांनी उताराला आडव्या सर्‍या पाडून टोकण पद्धतीने एक फूट अंतरावर एका ठिकाणी दोन बिया टाकून पेरणी करणे आवश्यक आहे.