शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ई-महासेवा केंद्र संचालकांची गळचेपी

By admin | Updated: July 18, 2014 00:45 IST

केंद्र संचालकांना एका खासगी कंपनीची पॉलिसी काढणे बंधनकारक; ई-महासेवा केंद्र संचालकांना असुविधा.

डॉ. किरण वाघमारे /अकोला
नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे काढण्याकरिता सुविधा निर्माण व्हावी, यासाठी ठिकठिकाणी ई-महासेवा केंद्र सुरू करण्यात आले. सी.एम.एस. या कंपनीकडून ही सुविधा नागरिकांना पुरविण्यात आली. नागरिकांची सुविधा तर झाली; परंतु केंद्र संचालकांना एका खासगी कंपनीची पॉलिसी काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे ई-महासेवा केंद्र संचालकांना केंद्र चालविताना असुविधा होत आहे.
शैक्षणिक आणि नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी तसेच रेशनकार्डसारखी आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी यापूर्वी नागरिकांना तहसील आणि उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. यासाठी नागरिकांना कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. तसेच काम लवकर होईल की नाही, याची शाश्‍वती नव्हती. कागदपत्रांसाठी दस्तऐवज लेखकाकडून (वाईंडर) अर्ज लिहून घ्यावा लागत असे. या कामात पूर्ण दिवस जात असे. कागदपत्रे काढण्याच्या कामात पारदर्शकता यावी, कामे लवकर व्हावी आणि सर्व कामे एकाच खिडकीत व्हावी, यासाठी राज्य शासनाने सुरुवातीला एक खिडकी योजना राबविली. पुढे स्वतंत्र सेतू केंद्र स्थापित करण्यात आले. आता ई-महासेवा केंद्र नावाने सेवा देण्यात येत आहे. संपूर्ण राज्यातील ई-महासेवा केंद्र चालू करण्याची जबाबदारी सी.एम.एस. या कंपनीकडे देण्यात आली आहे. केवळ कागदपत्रेच नाही तर इलेक्ट्रिक बिल भरणे, टेलिफोन बिल, डीटीएच, मोबाईल रिचार्जसारखी कामेदेखील ई-महासेवा केंद्राच्या माध्यमातून होऊ लागली आहेत.
ई-महासेवा केंद्रात मिळणार्‍या सुविधा नागरिकांच्या पचनी पडल्या आणि त्यांचा केंद्राकडे ओढा वाढू लागला आहे. नागरिकांचा ओढा लक्षात घेऊन केंद्रांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढू लागली आहे. राज्यातील सर्व जिल्हा ठिकाणे आणि तालुका स्तरावर ई-महासेवा केंद्र सुरू झालेले आहेत; परंतु या केंद्रांच्या मानगुटीवर सध्या पॉलिसी टार्गेटचे भूत बसले आहे. ह्यभारती एक्सा हॉस्पिटल कॅश पॉलिसीह्ण नावाची ही पॉलिसी फक्त रुग्णालयातील उपचारासाठी आहे. या पॉलिसीत ७५0 रुपयांचा प्रिमियम भरावा लागतो. या बदल्यात ई-महासेवा केंद्र संचालकाला ९३ रुपये कमिशन देण्यात येते. या पॉलिसीची मुदत १ वर्षाकरिता आहे. प्रत्येक केंद्र संचालकाला दर महिन्याला १0 पॉलिसींची सक्ती करण्यात आली आहे. पॉलिसी न काढल्यास केंद्र बंद करण्याचा किंवा सुविधा बंद करण्याचा इशारादेखील कंपनीकडून ई-मेलद्वारे केंद्र संचालकांना देण्यात आला आहे. यामुळे ई-महासेवा केंद्र संचालकांवर सध्या केंद्र चालवावे की पॉलिसीधारक बनवावे, असा पेच निर्माण झाला आहे.
राज्यात हजारो ई-महासेवा केंद्र आहेत. प्रत्येक केंद्राला दर महिन्याला १0 पॉलिसी काढण्याचे बंधन आहे. एका पॉलिसीचे ७५0 रुपये याप्रमाणे दर महिन्याला ७ हजार ५00 रुपये प्रत्येक केंद्र संचालकाला भरावे लागतात. केंद्र चालविण्यासाठी येणारा खर्च, भाडे, वीज बिल, इंटरनेट बिल, मोबाईल बिल, स्टेशनरी व इतर किरकोळ खर्च भागवतांनाच केंद्र संचालकांच्या नाकीनऊ येतात. त्यात पॉलिसीचा खर्च वाढल्यामुळे केंद्र कसे चालवावे, हा पेच त्यांच्यापुढे आहे. काही केंद्र चालकांनी हा भुर्दंड ग्राहकांवर टाकणे सुरू केले आहे. याकरिता ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क घेण्यात येत आहे. ही पॉलिसीची अट रद्द करण्याची मागणी ई-महासेवा केंद्र चालकांकडून होत आहे.

*सी.एम.एस. कंपनीकडे ई-महासेवा केंद्राची जबाबदारी
राज्यातील सर्व ई-महासेवा केंद्र संचालनाची जबाबदारी सी.एम.एस. या कंपनीकडे देण्यात आली आहे. या कंपनीने प्रत्येक जिल्हय़ात आपले व्यवस्थापक नियुक्त केले आहेत. हे व्यवस्थापक त्या-त्या जिल्हय़ातील ई-महासेवा केंद्राच्या कारभारावर नियंत्रण ठेवतात. केंद्रात जे पैसे ग्राहकांकडून घेतले जातात, ते सगळे कंपनीकडे आधी जमा होतात आणि मग महिन्याच्या शेवटी त्यातील १0 टक्के पैसे कमिशन स्वरूपात ई-महासेवा केंद्र संचालकांच्या बँक खात्यात जमा केले जातात.