भांग तस्करीतील आराेपीस पाच दिवस पाेलीस काेठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:54 IST2020-12-04T04:54:01+5:302020-12-04T04:54:01+5:30

लक्कडगंज येथील रहिवासी मनोज रामहरक बलाेदे याच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे ...

Cannabis smugglers arrested for five days | भांग तस्करीतील आराेपीस पाच दिवस पाेलीस काेठडी

भांग तस्करीतील आराेपीस पाच दिवस पाेलीस काेठडी

लक्कडगंज येथील रहिवासी मनोज रामहरक बलाेदे याच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून विशेष पथकाने सापळा रचून बुधवारी दुपारी छापा टाकला. या छाप्यात २ हजार १३५ किलो भांग व सहा किलो भिजवलेली भांग अशाप्रकारे एकूण दोन हजार १४१ किलो भांग जप्त केली. ही भांग सुमारे दोन टन असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष पथकाने मनोज बलाेदे यांना ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आराेपीस न्यायालयासमाेर हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली.

Web Title: Cannabis smugglers arrested for five days