शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

अमृत योजना: कंत्राटदार पळ काढण्याच्या तयारीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:27 IST

जीएसटीच्या सबबीखाली रखडले काम; सत्ताधारी-प्रशासनाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या कामांसाठी शासनाने ८७ कोटींच्या निविदेला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘अमृत’ योजनेच्या कामाचे ई-भूमिपूजन करण्यात आले होते. जीएसटी लागू झाल्यास पाइपलाइनच्या किमतीत वाढ होणार असल्याची सबब पुढे करीत संबंधित कंत्राटदाराने काम सुरू करण्यास आजपर्यंत टाळाटाळ केली. आता मात्र संबंधित कंत्राटदार या कामातून पळ काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या कामात सुधारणा करण्याचा समावेश असून, दुसऱ्या टप्प्यात भूमिगत गटार योजना कार्यान्वित केली जाईल. ‘अमृत’ योजनेसह नगरोत्थान अभियानच्या माध्यमातून राज्यातील २८ शहरांमध्ये १ हजार ६२२ कोटी रुपयांच्या विकास कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल महिन्यात एकाच वेळी २८ शहरांमधील विकास कामांचे ई-भूमिपूजन करण्यात आले होते. ‘अमृत’ योजनेंतर्गत संपूर्ण शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तयार केलेल्या २५४ कोटींच्या ‘डीपीआर’ (प्रकल्प अहवाल) मधील ११० कोटी ८४ लाखांच्या प्रस्तावाला शासनाच्या तांत्रिक मूल्यमापन समिती व उच्चाधिकार समितीने मंजुरी दिल्यानंतर ८७ कोटींची निविदा जारी करण्यात आली होती. ‘एपी अ‍ॅन्ड जीपी’ नामक एजन्सीची निविदा मंजूर करण्यात आली. १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यास पाइपलाइनच्या किमतीत वाढ होईल. त्यामुळे ही अतिरिक्त रक्कम कोण देणार, असा मुद्दा एजन्सीने उपस्थित करून कार्यादेश घेण्यास टाळाटाळ केल्याची माहिती आहे. जीएसटी लागू झाल्यानंतरही यासंदर्भात शासनाकडून ठोस मार्गदर्शन मिळत नसल्याची परिस्थिती आहे. सत्ताधारी भाजपासह प्रशासनाने हा तिढा तातडीने निकाली काढणे अपेक्षित असताना तसे होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी संबंधित कंत्राटदार पळ काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. ...तर योजनेच्या किमतीत होईल वाढ!मनपाने नियुक्त केलेल्या ‘एपी अ‍ॅन्ड जीपी’ एजन्सीमध्ये दोन भागीदार आहेत. यापैकी सिंधी कॅम्पमध्ये राहणारा एक भागीदार सुरुवातीपासूनच नकारात्मक भूमिकेत आहे. यातील एकाही भागीदाराने पळ काढल्यास योजनेची दुसऱ्यांदा निविदा काढताना किमतीत वाढ होईल. यामुळे मनपाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. संबंधित कंत्राटदाराने जीएसटीमुळे योजनेवर होणाऱ्या परिणामांची काळजी करण्याचे कारण नाही. शुल्लक सबब पुढे करून योजनेत खोळंबा निर्माण केल्यास कंत्राटदाराच्या एजन्सीला काळ््या यादीत टाकावे लागेल. - विजय अग्रवाल, महापौर