शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Exam Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
3
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
4
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
5
Video - "चोर-चोर, TMC चोर";निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
6
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
7
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
8
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
9
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
10
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
11
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
12
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
13
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
14
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
15
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
16
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
17
टी-२० संघातून सूर्यकुमार यादवचा पत्ता कट, 'हा' खेळाडू बनणार नवा कर्णधार?; BCCI करतंय विचार
18
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
19
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
20
'उरी' फेम रिवा अरोरासोबत डिलिव्हरी बॉयचं गैरवर्तन, शिवीगाळही केली; म्हणाली- "जेव्हा तो सामान घेऊन आला..."
Daily Top 2Weekly Top 5

भेटीगाठीसोबतच मदतही आटली; वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST

मूर्तिजापूर : घरापासून कोसोदूर असलेले अनेक वृद्ध आपल्या जीवनातील शेवटचे क्षण व्यतीत करीत आहेत. अनेक वृद्धांची आपल्या जवळच्या नातेवाइकांशी ...

मूर्तिजापूर : घरापासून कोसोदूर असलेले अनेक वृद्ध आपल्या जीवनातील शेवटचे क्षण व्यतीत करीत आहेत. अनेक वृद्धांची आपल्या जवळच्या नातेवाइकांशी वर्षापासून भेटगाठ नसून, मुले व आप्तेष्ट वृद्धाश्रमाकडे फिरकले नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे, तसेच वृद्धाश्रमात मदतही आटल्याचे चित्र समोर आहे. येथील महात्मा फुले वृद्धाश्रमाला भेट दिली असता वृद्धाश्रमातील वृद्धांनी अश्रूंना वाट मोकळी करून आपली करुण कहाणी ‘लोकमत’जवळ मांडली.

येथील म. फुले वृद्धाश्रम शासकीय मदतीने चालतो. बाहेरून येणारी मदत शून्य असली, तरी वृद्धाश्रमाचे संचालक मोठ्या कसरतीने वृद्धाश्रम चालवीत आहेत. मुलांनी व जवळच्या नातेवाइकांनी वाळीत टाकलेल्या वृद्धांचा भरणा अधिक दिसून आला. कोणी इंजिनिअर, कोणी अधिकारी, तर कोणी शिक्षक असूनही आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यात आले आहे. कोरोनाने नातेवाईक दूर केले; परंतु वृद्धाश्रमात राहणारे आधीच समाज व नातेवाइकांपासून दूर आहेत. त्यांचे चार भिंतींआड असलेले जग या निमित्ताने सर्वच काही सांगून जाते. दोन मुले इंजिनिअर आहेत. सुनांसोबत पटले नाही म्हणून वीस वर्षांपासून वृद्धाश्रमात आहे. कुणीही भेटीला येत नाही. एक- दोन वेळा मुलगा भेटायला आला होता. घरच्यापेक्षा येथेच सेवा व काळजी घेतली जाते, पोरगं हायस्कूल मास्तर हाय, हे सून म्हंते मोठ्याकडं राय अन्‌ लायनी म्हंते तिकडेच राय, अशी अवस्था असल्यानं आता कोणाकडं जावं, या विवंचेतून येथे आल्याचे एका स्थानिक शहरातील रहिवासी महिलेने सांगितले. आई- वडील नाहीत. पत्नी मरण पावली. दवाखान्यात कोणीतरी भरती केले व निराधार असल्याने येथेच राहतो, अशी व्यथाही एका वृद्धाने व्यक्त केली. मुलाने प्रेमविवाह केला. मुलगा घर सोडून गेला. सून कोठे गेली माहीत नाही. जवळचे नातेवाईक कोणी नाही. मावसभावाने येथे आणले. येथेच राहायचे आहे, अशी एक वृद्धा म्हणाली. कोरोनाने माणसातील माणुसकी आटली, हे खरे असले तरी वृद्धाश्रमात राहणारे, सामाजिक दुरी असलेलेच जीवन जगतात, शासन व संस्थेच्या मदतीतून त्यांचा निर्वाह चालतो, शासकीय अनुदान वेळेवर मिळत नाही, हे वास्तव असले तरी सामाजिक जाणीव ठेवून वृद्धाश्रम चालविला जातो.

--------------

आश्रमातील बहुतेक वृद्धांना कोणी भेटायला येत नाही. येथे अनेक वर्षांपासून वृद्ध वास्तव्यास आहेत. चार- पाच वर्षांत कोणी एखादा नातेवाईक भेटायला आला तर आला. कोरोनाकाळात गत वर्षापासून वृद्धांना कोणीही नातेवाईक भेटायला आला नसल्याचे वास्तव आहे. भेटणाऱ्यांची संख्या अर्थात शून्यावर आहे.

----------------

वृद्धाश्रम शासकीय मदतीवर चालतो. बाहेरून सामाजिक मदत एखाद्यावेळी धान्य स्वरूपात मिळते. सामाजिक मदत मिळत नसल्याने व शासकीय अनुदान वेळेवर मिळत नसल्याने बहुतेक मदतीचा ओघ आटला आहे. संचालकांवर अनेक वेळा पदरमोड करून वृद्धांची व्यवस्था करण्याची पाळी येते.

-------------------

गेली दोन वर्षे झालीत मी या वृद्धाश्रमात आहे. मी मूर्तिजापूर येथील असून, माझी दोन मुले आहेत. लहान मुलगा शिक्षक आहे, तर मोठा इतरत्र काम करतो. आतापर्यंत मोठ्या मुलाकडे राहिली. त्यामुळे लहान मुलगा स्वीकार करीत नाही.

-वृद्ध महिला

-------------

माझा एक मुलगा इंजिनिअर आहे आणि एकाचा चांगला व्यवसाय आहे. मी अनेक वर्षे झालीत या वृद्धाश्रमात आहे. सहा वर्षांपूर्वी मुलगा भेटायला आला होता. तेव्हापासून त्याची परत येण्याची वाट बघतो आहे.

-वृद्ध पुरुष

------------------

मुलगा आणि सून मला सोडून कुठेतरी निघून गेले. मला कोणाचाही आधार नसल्याने जीवन जगायचे कसे, असा मोठा प्रश्न पडला. एका जवळच्या नातेवाइकाने कारंजावरून वृद्धाश्रमत आणून ठेवले. गेली आठ वर्षे इथे राहत असल्याने आता हाच माझा शेवटचा आधार झाला आहे.

-वृद्ध महिला