शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटींचे रस्ते अन फोर-जी; नगरसेवकांची चुप्पी

By admin | Updated: July 20, 2014 02:00 IST

अकोला महानगरपालिका प्रशासन ठरले वरचढ.

अकोला : अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्ते दुरुस्तीसाठी शासनाकडून प्राप्त १५ कोटींचे अनुदान व फोर-जी करारातून मनपाच्या तिजोरीत जमा झालेल्या १२ कोटी ९१ लाख ९0 हजारांच्या मुद्यावर एक ाही नगरसेवकाने प्रशासनाला साधी विचारणा केली नाही. सर्वसाधारण सभेत या मुद्यावर जाब विचारणार असल्याच्या गप्पा करणार्‍या नगरसेवकांनी चुप्पी साधल्याने यामध्ये पाणी मुरत असल्याच्या शंकेने वाव घेतला आहे.
शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी महापालिकेला १५ कोटींचे अनुदान मिळाले. या निधीतून प्रशासनाने प्रमुख १८ रस्त्यांची यादी तयार केली. यामध्ये सात रस्ते सिमेंट काँक्रहटचे केले जातील. प्रमुख रस्त्यांची यादी तयार करतेवेळी प्रशासनाने सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांकडून साधे मतही मागविले नाही. हा विषय पूर्णत: प्रशासकीय बाब असल्याचे सांगत प्रशासनाने निविदा प्रक्रियेचे घोडे दामटले. या प्रमाणेच शहरात फोर-जी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स कंपनीने प्रशासनासोबत १२ कोटी ९१ लाख ९0 हजारांचा करार केला. यामध्ये पुनर्भरणाचे दर (रिस्टोरेशन चार्ज) व सुपर व्हिजन दराच्या (देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍यांचे दर) आकारणीचा समावेश आहे. यापूर्वी सत्तापक्षाने २६ फेबुवारी २0१४ रोजी पार पडलेल्या सभेत १४ कोटी रुपयांत रिलायन्स कंपनीसोबत करार केल्याचे स्पष्ट केले होते. या करारात टॉवर्स उभारणीचा समावेश होता. परंतु सत्तापक्षाने २६ फेब्रुवारीच्या सभेत कोणतीही चर्चा न करता प्रस्ताव मंजूर केल्याने ही सभा रद्द करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती.
मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी ही सभा रद्द करीत तसा अहवाल शासनाला कळवला. त्यानंतर प्रशासनाने रिलायन्ससोबत फक्त खोदकाम करून फायबर ऑप्टीक केबलचे जाळे पसरविण्याचा करार केला. ही रक्कम प्रशासनाच्या खात्यात जमा झाली असून, शहराच्या विविध भागात फोर-जीच्या कामाला सुरुवात झाली आहे. रस्ते दुरुस्तीच्या १५ कोटींसह फोर-जीच्या १२ कोटी ९१ लाखाच्या मुद्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला विचारणा करणे अपेक्षित होते. यावर एकाही नगरसेवकाने विचारणा केली नसल्याने शंक ा-कुशंकांना वाव मिळाला आहे.