नेवासा-शेवगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST2020-12-24T04:19:40+5:302020-12-24T04:19:40+5:30

भेंडा : नेवासा-शेवगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम दीपावलीपूर्वी सुरू झालेले आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने आतापर्यंत हे काम ...

The work of filling the potholes on Nevasa-Shevgaon road is slow | नेवासा-शेवगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम संथगतीने

नेवासा-शेवगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम संथगतीने

भेंडा : नेवासा-शेवगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम दीपावलीपूर्वी सुरू झालेले आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने आतापर्यंत हे काम फक्त दहा किलोमीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. नेवासा फाटा ते सौंदाळा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामास दीड महिना लागला. पुढील खड्डे बुजवत असताना नेवासा फाटा ते भानसहिवरा रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. बुजवलेले खड्डे समपातळीत बुजवले नसल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणारी वाहने उलटूून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. हा रस्ता नेहमी वर्दळीचा आहे. यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम दर्जेदार व झपाट्याने करावे, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.

Web Title: The work of filling the potholes on Nevasa-Shevgaon road is slow