शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

युपीएससीत पारनेरचा झेंडा

By admin | Updated: June 15, 2014 00:31 IST

पारनेर : दुष्काळी तालुका व राज्याला गुरुजी पुरविणारा तालुका अशी राज्यात ओळख असणाऱ्या पारनेर तालुक्याच्या शिरपेचात प्रशांत सुंबे, गणेश पोटे, योगेश उंडे, संदीप साठे, ऋषीकेश खिलारी या

पारनेर : दुष्काळी तालुका व राज्याला गुरुजी पुरविणारा तालुका अशी राज्यात ओळख असणाऱ्या पारनेर तालुक्याच्या शिरपेचात प्रशांत सुंबे, गणेश पोटे, योगेश उंडे, संदीप साठे, ऋषीकेश खिलारी या युवकांनी मानाचा तुरा खोवला आहे़ युपीएससी परीक्षेत एकाचवेळी पाच आय.ए.एस .अधिकारी देण्याचा इतिहास त्यांनी घडविला असून राज्यातील पारनेर हा पहिलाच तालुका ठरला आहे.
पारनेर तालुक्याची ओळख राज्याला दुष्काळी तालुका म्हणून आहे. त्यानंतर राज्याला सर्वाधिक शिक्षक पुरविणारा तालुका म्हणून गणना केली जाऊ लागली. पण गुरुवारी दुपारी देशातील प्रमुख शासकीय सेवेची परीक्षा असणाऱ्या युपीएससी परीक्षेत प्रशांत सुंबे (पाडळी आळे), योगेश उंडे (कर्जुले हर्या), गणेश पोटे (राळेगणसिध्दी), संदीप साठे (हंगा), ऋषीकेश खिलारी (टाकळी ढोकेश्वर) यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. आणि त्यांचे आय.ए.एस. होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
पारनेरला न्यु इंग्लीश स्कुलमध्ये शिक्षण घेतलेला प्रशांत सुंबे याने इलेक्ट्रीक व टेलीकम्युनिकेशन इंजीनीअरींगचा अभ्यास पूर्ण करतानाच युपीएससीकडे लक्ष दिले. पुण्यात अभ्यास करुन त्याने यश मिळविले. पारनेर एस.टी. आगारात मॅकेनिक असणारे आप्पासाहेब व आई मीरा यांचे मार्गदर्शन लाभल्याचे प्रशांत सांगतो. तर योगेश उंडे हा कर्जुले हर्या येथील हरेश्वर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे़ प्रवरानगरला इलेक्ट्रीक व टेलीकम्युनिकेशन इंजीनीअरींगचा अभ्यास पूर्ण करुन त्याने हे यश मिळविले. वडील पांडुरंग हे बीएसएनएलमध्ये सेवेत आहेत. आई नंदा यांचे स्वप्न त्याने पूर्ण केले़ स्टेट बँकेतील अधिकारी त्याचे काका रामदास उंडे व मुख्याध्यापक अशोक बोंदाणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभल्याचे योगेश ने सांगितले. राळेगणसिध्दीचा गणेश पोटे याचे उदाहरण वेगळेच आहे. राळेगणसिध्दीच्या नापासांच्या शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर एम.बी.बी.एस. केले़ उपजिल्हाधिकारी झाला. सध्या तो अकोला जिल्ह्यात कार्यरत होता. आता त्याचे आय.ए़एस.चे स्वप्न पूर्ण झाले. वडील संपत पोटे व त्याच्या आईचे त्याला मार्गदर्शन लाभले आहे. शिवाय अण्णा हजारेंचा आदर्श समोरच होता. हंगा येथील संदीप प्रदीप साठे यानेही एम.बी.बी.एस. पूर्ण केल्यानंतर हे यश मिळविले. वडील प्रदीप सोलापूर महापालीकेत उपायुक्त आहेत़ आई सुनीता यांचेही मार्गदर्शन लाभले. ऋषीकेश खिलारी हा टाकळी ढोकेश्वरचा. पण सध्या त्याचे वास्तव्य राहुरी तालुक्यात आहे.