शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोधचे 'फिक्सिंग' फसले

By admin | Updated: December 22, 2015 16:49 IST

बंद पडलेल्या श्रीरामपूरच्या मुळा- प्रवरा वीज सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न हाणून पाडल्यामुळे अखेर निवडणुकीलाच सामोरे जावे लागणार आहे.

 श्रीरामपूर : बंद पडलेल्या श्रीरामपूरच्या मुळा- प्रवरा वीज सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न हाणून पाडल्यामुळे अखेर निवडणुकीलाच सामोरे जावे लागणार आहे.आतापर्यंत संस्थेत एकमेकांच्या विरोधात राजकारण करणार्‍या सर्व प्रमुखांनी निवडणूक टाळून बिनविरोध संचालक मंडळ निवडण्यासाठी फिक्सिंग केले. पण हे फिक्सिंग शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पवार, विखे विरोधक अरुण कडू व इतरांनी हाणून पाडीत निवडणुकीला सामोरे जाण्यास भाग पाडले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न चालविले होते. स्थानिक पातळीवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे पटत नसल्याने ससाणे यांचा बिनविरोधला विरोध होता. तरीही त्यांना यासाठी राजी करण्यात आले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुरीचे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे १३ जागांसाठी ३४ उमेदवार अंतिम रिंगणात राहिले आहेत. राहात्याचे सहायक निबंधक आर. एल. त्रिभुवन निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.मतदार संघ निहाय उमेदवारांची नावे:- भटक्या जाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग: नगरसेवक संजय छल्लारे (श्रीरामपूर), भास्कर फणसे (हणमंतगाव), पांडुरंग शिंदे (गळनिंब).अनुसूचित जाती, जमाती : चित्रसेन रणनवरे (टाकळीभान), पोपट गायकवाड (श्रीरामपूर), वसंत ब्राम्हणे (धानोरे).इतर मागास प्रवर्ग: नितीन पटारे (कारेगाव), रमजान शहा (श्रीरामपूर), मच्छिंद्र अंत्रे (सोनगाव).श्रीरामपूर शेती: नितीन पटारे (कारेगाव), गंगाधर पाटील (शिरसगाव), इंद्रभान थोरात (उक्कलगाव).बाभळेश्‍वर शेती: अंबादास ढोकचौळे (रांजणखोल), अरुण कडू (सात्रळ), बाबासाहेब निर्मळ (पिंप्री निर्मळ), पांडुरंग शिंदे (गळनिंब), सुजय विखे (लोणी बुद्रक).श्रीरामपूर घरगुती, व्यापारी, औद्योगिक: अमजद कुरेशी, सिद्धार्थ मुरकुटे, गंगुबाई पवार, जलीलखान पठाण, युनूस शेख.बाभळेश्‍वर घरगुती, व्यापारी, औद्योगिक : दगडू भांड, नारायण घोरपडे, दीपक शिरसाठ, देविचंद तांबे.महिला राखीव : तमीजबी शेख, मंदाकिनी तुवर (श्रीरामपूर), शशीकला सुभाष पाटील (वांबोरी), रतनबाई तुकाराम बेंद्रे (बाभळेश्‍वर).(प्रतिनिधी)