शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दोन जीपच्या धडकेत पोलीस निरीक्षकासह दोन ठार

By admin | Updated: September 20, 2016 00:13 IST

संगमनेर : भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पोलीस निरीक्षकासह दोन जण जागीच ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाले.

संगमनेर : भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पोलीस निरीक्षकासह दोन जण जागीच ठार, तर ४ जण गंभीर जखमी झाले. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावरील डोळासणे शिवारात हा अपघात झाला.
मृतांमध्ये नाशिक येथे वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संजय रामकृष्ण विसपुते (वय ५४) यांचा समावेश आहे. विसपुते हे इनोव्हा कार (क्र. एम.एच.१५ सी.टी.६५४३) या वाहनातून पुण्याहून नाशिककडे येत होते. डोळासणे शिवारात सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास सदर वाहन व समोरुन येणारी बोलेरो जीपची (क्र. एम.एच.१६ ए.जे.६१४६)) समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिक व इतर वाहन चालक घटनास्थळी पोहचले. घारगावचे पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले. या अपघातात पोलीस निरीक्षक विसपुते यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
बोलेरो जीपमधील शाबिरा पीरमहमंद शेख (वय ५०) या महिलेलाही गंभीर मार लागल्याने तिचाही मृत्यू झाला. या वाहनातील शाकीरा शेख (वय ४०), मुश्ताक सय्यद (वय २७), युसूफ अली सय्यद (वय ५५)),मोहंम्मद पीरमहंमद सय्यद (वय ६०, सर्व. रा. घारगाव) हे गंभीर जखमी झाले. यावेळी रामनाथ कसबे, सुरेश गाडेकर, आत्तार सय्यद, दीपक भांगरे, भास्कर पिचड यांनी सहकार्य करुन सर्व जखमींना तातडीने संगमनेरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा घारगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला नव्हता.
(तालुका प्रतिनिधी)