दादा पाटील महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांचे ट्रेकिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:09+5:302021-09-25T04:21:09+5:30
१७ महाराष्ट्र बटालियनचा साहसी उपक्रम म्हणून यात मेजर डॉ. संजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ११६ छात्रसैनिकांनी रेहकुरी ट्रेकिंग केले. ...

दादा पाटील महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांचे ट्रेकिंग
१७ महाराष्ट्र बटालियनचा साहसी उपक्रम म्हणून यात मेजर डॉ. संजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ११६ छात्रसैनिकांनी रेहकुरी ट्रेकिंग केले. अभियानाकरिता रेहकुरीचे फॉरेस्ट अधिकारी सागर केदार यांनी छात्र सैनिकांना येथील परिसराची माहिती दिली. या उपक्रमाबद्दल कर्नल जीवन झेंडे, कर्नल विनय बाली, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, आमदार रोहित पवार, कॉलेज विकास समितीचे चेअरमन राजेंद्र फाळके, बप्पासाहेब धांडे, अंबादास पिसाळ, राजेंद्र निंबाळकर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. अनंत सोनवणे, उपप्राचार्य प्रा. बी. एन. मोरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. जी. ठुबे, उपप्राचार्य प्रतापराव काळे, शिवाजी धांडे, प्रकाश धांडे, विजू काळदाते, प्रा. डॉ. संतोष भुजबळ यांनी एन.सी.सी. विभागाचे कौतुक केले
मेजर डॉ. संजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक किसन सूळ, दीपाली गावडे, वैष्णवी दवणे, सारिका शिंदे, समर्थ निंबाळकर, हरी नवसरे, मनोज मंडलिक, शुभम सुद्रिक, संकेत साबळे, अनिकेत गुंड, शुभम कदम या सर्व छात्रसैनिकांनी परिश्रम घेतले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना ही आगळीवेगळी मानवंदना देत असताना आम्हाला या बाबीचा गर्व आहे, असे मत डॉ. मेजर संजय चौधरी यांनी व्यक्त केले.
---------
फोटो - २४एनसीसी
दादा पाटील महाविद्यालयातील एन.सी.सी विभागामार्फत कर्जत ते रेहकुरी परिसरामध्ये छात्रसैनिकांनी ट्रेकिंग अभियान राबवले.