शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

थोरात यांच्या छबीचा असाही विक्रम !

By admin | Updated: June 23, 2016 01:25 IST

विलास गुंजाळ , संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालगत लावण्यात आलेला आमदार बाळासाहेब थोरात यांच्या फ्लेक्स बोर्ड चर्चेचा विषय बनला आहे

विलास गुंजाळ , संगमनेरशहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालगत लावण्यात आलेला आमदार बाळासाहेब थोरात यांच्या फ्लेक्स बोर्ड चर्चेचा विषय बनला आहे. तब्बल १५ वर्षापेक्षाही अधिक काळापासून एकाच जागेवर थोरातांचा चेहरा झळकत असल्याने एकाच जागेवरील फ्लेक्स बोर्डचा हा अनोखा विक्रम ठरला आहे.संगमनेर शहरात मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. पुतळ्याजवळ नाशिक-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने दररोज हजारो नागरिक या रस्त्यावरून ये-जा करतात. थोरात समर्थकांनी फ्लेक्स बोर्डसाठी या जागेची निवड केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालगत गाडे यांच्या खासगी मालकीच्या इमारतीच्या भिंतीला हा फ्लेक्स बोर्ड झळकण्यास सुरूवात झाली. पाटबंधारे राज्यमंत्रीपद मिळाल्यापासूनच म्हणजे १९९९ नंतर या जागेवर थोरातांचा चेहरा झळकायला लागला. निवडणूक आचार संहितेचा कालावधी वगळता सलगपणे या जागेवर फ्लेक्सबार्ड अस्तित्वात आहे. नवीन वर्षाच्या स्वागतापासून सर्वधर्मीयांच्या सणानिमित्त शुभेच्छा असो वा प्रत्यक्ष थोरातांचे अभिनंदन असो. मजकूर बदलून फ्लेक्स बोर्डवर आ. थोरात सातत्याने झळकत आहेत. शहरातील फ्लेक्स बोर्डबाबत मध्यंतरी कारवाई केली होती. यानंतर विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी घेतल्याशिवाय फ्लेक्स लावू नये अशी सूचना केली. यानंतर विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी घेऊन आपआपल्या नेत्यांचे फ्लेक्स लावले. थोरातांच्या या फलकाचीही परवानगी घेतली गेली आहे. थोरात यांचा फलक कार्यकर्त्यांनी लावलेला आहे. नगरपालिकेला कराचा भरणा४फ्लेक्स बोर्ड हा खासगी मालकीच्या जागेत असल्याने संबंधित मालकाचे संमतीपत्र घेऊन नाममात्र दरात फ्लेक्सबोर्ड झळकत आहे. २०१५ साली विश्वास मुर्तडक व २०१६ साली गणेश मादास यांनी नगरपालिकेला १३६८ रूपये भरून पालिकेचा रितसर कर भरला. त्यापूर्वी किती पैसे भरले याची माहिती उपलब्ध झाली नाही.शिवप्रेमींनी व्यक्त केली होती नाराजी४छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्याही वर हा फ्लेक्स बोर्ड झळकत असल्याने मध्यंतरी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी या फ्लेक्स बोर्डला आक्षेप घेतला होता. काही शिवसैनिकांनी भला मोठा भगवा झेंडा शिवाजी पुतळ्यामागे लावून थोरातांचा फ्लेक्स झाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या आक्षेपानंतरही हा फ्लेक्स बोर्ड झळकत असल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती.