सुजय विखे ११ कोटींचे ‘धन’श्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 03:05 IST2019-04-02T03:04:54+5:302019-04-02T03:05:16+5:30

३७ वर्षांचे सुजय न्यूरो सर्जन असून त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे ४ कोटी ९१ लाख ७६ हजार ९९६ जंगम मालमत्ता, तर स्थावर मालमत्ता ६ कोटी २५ लाख ७९ हजार ४४३ रुपये आहे

Sujay Dikha's 'Dhan' Shree 11 Crore! | सुजय विखे ११ कोटींचे ‘धन’श्री!

सुजय विखे ११ कोटींचे ‘धन’श्री!

अहमदनगर : येथील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांची कौटुंबिक संपत्ती सुमारे १७ कोटींची आहे. स्वत: त्यांच्याकडे ११ कोटी १७ लाखांची संपत्ती असून, त्यांची पत्नी धनश्री याही ५ कोटी ७ लाखांच्या मालकीण आहेत, असे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे.

३७ वर्षांचे सुजय न्यूरो सर्जन असून त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे ४ कोटी ९१ लाख ७६ हजार ९९६ जंगम मालमत्ता, तर स्थावर मालमत्ता ६ कोटी २५ लाख ७९ हजार ४४३ रुपये आहे. सुजय यांच्याकडे १५ लाख ८४ हजारांचे ५१ तोळे, तर धनश्री यांच्याकडे २१ लाख ४१ हजारांचे ६९ तोळे सोने आहे. सुजय यांच्या नावे २४ एकर, पत्नीकडे २७ एकर, तर त्यांच्या अवलंबित्वाकडे ११ एकर जमीन आहे. सुजय यांचा पुण्याला दोन गुंठ्याचा बंगला आहे. त्यांचे ४७ बँकांत खाते आहे. स्वत:च्या नावावर एकही वाहन नसल्याचे त्यांनी नमूद आहे. त्यांच्या पत्नीकडे तीन वाहने आहेत.
 

Web Title: Sujay Dikha's 'Dhan' Shree 11 Crore!