शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये पाऊस परतला ; खर्ड्यात वाहतूक बंद

By admin | Updated: September 21, 2016 00:27 IST

जामखेड / खर्डा : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला


जामखेड / खर्डा : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.
मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. शहरात पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. ठिकठिकाणी पाणी साचले होते. हा पाऊस रब्बी हंगामासाठी उपयुक्त आहे. आतापर्यंत तालुक्यात ७१ टक्के पाऊस झाला आहे. तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर तालुक्यात पावसाने सुरुवात केली होती.
खर्डा, नान्नज, जातेगाव येथे अतिवृष्टी होऊन परतीच्या पावसाला प्रारंभ सुरुवात झाली. नान्नज व जवळा येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे तेथील नदीला पाणी आले.
जलसंधारण कामामुळे नदीवरील बंधारे ओव्हरफ्लो झाले. मुंजेवाडी तलावात ६० टक्के पाणी आले आहे.
सोताडा (ता. पाटोदा) येथे मंगळवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावात पाणी येत आहे. यापूर्वीच भुतवडा तलाव ७० टक्के भरला आहे. चार वर्षांनंतर तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील पाणीटंचाई संपुष्टात येणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मंगळवारी सायंकाळी साडे सहा वाजेनंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खर्डा (ता. जामखेड) येथील शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावरील वाहतूक बंद पडली.
पावसामुळे पुलावर पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक बंद पडली आहे.
परिसरातील नदी नाले मंगळवारी दुधडी भरून वाहत होते. नदी नाल्यांना पाणी आल्यामुळे प्रवासी गाड्यांसह एस. टी. बससह प्रवासी वाहनांना पाणी ओसरेपर्यंत पैलतिरांवर उभे रहावे लागले.
कौतुका नदीवरील पूल ऐतिहासिक जुना दगडी आहे. पुलाचे चिरे निखळले आहेत. जुना दगडी पूल दुरूस्तीला आला आहे. पहिल्या पावसातच पूल नादुरुस्त झाला आहे. विद्यार्थी, दूधवाले, शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचा पुलावरुन पाणी गेल्यामुळे काही वेळ गावाशी संपर्क तुटला, असे खर्डाच्या वार्ताहराने कळविले आहे.
(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)