शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या ऊसभावासाठी प्रहार संघटना मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST

शेतकऱ्यांच्या ऊसभावाची रक्कम मिळण्यासाठी प्रहार संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ...

शेतकऱ्यांच्या ऊसभावाची रक्कम मिळण्यासाठी प्रहार संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या. थकीत रक्कम असलेल्या कारखान्यांना परवानगी देऊ नये, जे कारखाने रीतसर भाव आणि वेळेवर पैसे देतील, त्यांना ऊस द्यावा, कारखान्यांचे वजन काटे निरीक्षण करताना निरीक्षण पथकाबरोबर शेतकरी प्रतिनिधी असावा, कारखान्यांनी हंगाम सुरू होण्याअगोदर उसाचा भाव जाहीर करावा, ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांना कडक निकष लावण्यात यावेत, ऊस कारखान्याला, तर वाढे शेतकऱ्यांना द्यावेत, कारखान्यांनी अगोदर आपल्या गटातील ऊस न्यावा, नंतर इतर उसाला प्राधान्य द्यावे, शेतकरीनिहाय यादी आयुक्त कार्यालयाला सादर करावी, कारखान्यांच्या ऊसभावात तफावत नसावी, ऊसतोडीची कार्यवाही जशा नोंदी आल्यात तशीच व्हावी, अशा अनेक मागण्या प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी साखर सहसंचालकांकडे मांडल्या. मात्र, त्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत दोषी कारखान्यांवर कडक कारवाईच्या सूचना दिल्या.

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, सल्लागार मालोजी शिकारे, शेवगाव तालुकाध्यक्ष संदीप बामदळे, भीमराव पाटील, बंडू उगले आदी उपस्थित होते.

-----------------

फोटो -१५प्रहार संघटना

शेतकऱ्यांना उसाचे थकित पेमेंट मिळावे यासह विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.