पिंपळनेर येथील एकाची गोळ्या झाडून हत्या ? संशयावरून तिघे जण ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 15:06 IST2021-07-11T15:06:13+5:302021-07-11T15:06:45+5:30

श्रीगोंदा /देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे बेलवंडी -शिरूर रस्त्यालगत कुकडी कॉलनी बसथांब्याजवळ पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील पांडुरंग जयवंत पवार ( वय - ५२ ) यांचा मृतदेह आढळून आला.

One shot dead in Pimpalner? Three people were detained on suspicion | पिंपळनेर येथील एकाची गोळ्या झाडून हत्या ? संशयावरून तिघे जण ताब्यात 

पिंपळनेर येथील एकाची गोळ्या झाडून हत्या ? संशयावरून तिघे जण ताब्यात 

श्रीगोंदा /देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे बेलवंडी -शिरूर रस्त्यालगत कुकडी कॉलनी बसथांब्याजवळ पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील पांडुरंग जयवंत पवार ( वय - ५२ ) यांचा मृतदेह आढळून आला.

 

डोक्याच्या जखमेवरून गोळीबार करुन पांडुरंग पवार यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  या प्रकरणी पोलिसांनी पिंपळनेर येथील तिघांना ताब्यात घेतले आहे. 

पांडुरंग पवार यांचा गोळी झाडून हत्या करण्यात आली. हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शनिवारी रात्री देवदैठण गावाजवळ तेथे टाकला असावा पोलिसांनी संशय व्यक्त केला. मृतदेहाची ओळख मयताचा मुलगा सागर पवार यांना पटली आहे.

सकाळच्या वेळी राजेंद्र जयवंत कौठाळे, अमोल कौठाळे यांनी पाहिले. नंतर त्यांनी बेलवंडी पोलीसांना संपर्क केला.

पवार यांच्या कपाळावरून पाठीमागे आरपार  जाणारी  मोठी जखम आढळून आली.  हा गोळीबार करून खुन केल्याचा संशय व्यक्त होत आहे.  मात्र हा हत्या कोणी कशासाठी कशाने कधी कुठे केला हे आरोपी जेरबंद केल्यानंतर समजणार आहे.

घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, कर्जतचे पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब जाधव, बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, सहाय्यक फौजदार मधुकर  सुरवसे, पोलीस हवलदार मारुती कोळपे, रावसाहेब शिंदे , नंदकुमार नाईक , हसन शेख, ज्ञानेश्वर पठारे, सतीश शिंदे, कैलास शिपनकर हे घटना स्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

नगर येथील रक्षा श्वान, फॉरेन्सिक लॅब टिम,  फ्रिंगर प्रिट टिम घटना स्थळी दाखल होऊन तपासाची सुत्रे फिरवली.

Web Title: One shot dead in Pimpalner? Three people were detained on suspicion