शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी ग्रामस्थांशी संवाद साधलाच नाही; नागरिकांचा अपेक्षा भंग

By admin | Updated: April 30, 2017 18:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार असल्याच्या अपेक्षेने सर्व गाव व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी हॉलमध्ये जमा झाला़

आॅनलाइन लोकमतपिंपळगाव माळवी (अहमदनगर), दि़ ३० - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रामस्थांशी थेट संवाद साधणार असल्याच्या अपेक्षेने सर्व गाव व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी हॉलमध्ये जमा झाला़ मात्र, मोदींनी गावकऱ्यांशी संवाद न साधता केवळ ‘मन की बात’ ऐकविल्यामुळे ग्रामस्थांचा अपेक्षा भंग झाला़पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी (दि़ ३०) ते पिंपळगाव माळवी (ता़ नगर) ग्रामस्थांशी संवाद साधणार असल्याचे भाजपाच्यावतीने गावकऱ्यांना सांगण्यात आले होते़ प्रसिद्धी माध्यमांनाही खा़ दिलीप गांधी यांनी पंतप्रधान मोदी पिंपळगाव ग्रामस्थांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असल्याचे कळविले होते़ या कार्यक्रमाची गावात जय्यत तयारी करण्यात आली होती़ जिल्हा परिषद शाळेमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सचा सेट उभा करण्यात आला होता़ सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी संवाद साधणार असल्यामुळे गावकरी मोठ्या अपेक्षेने शाळेत दाखल झाले़ टीव्हीवरुन सकाळी ११ वाजता मोदींची ‘मन की बात’ कार्यक्रम सुरु झाला़ सर्व ग्रामस्थ टीव्हीसमोर कान देऊन मोदींची ‘मन की बात’ ऐकू लागले़ कार्यक्रम संपला तरी मोदींनी ग्रामस्थांशी संवाद साधलाच नाही़ त्यामुळे अपेक्षा भंग झालेल्या ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली़ त्यावेळी तेथे उपस्थित असलेले क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे माधव जायभाय, अविनाश गरुड यांनी उपस्थित काही ग्रामस्थांच्या कार्यक्रमाबाबत आणि सरकारच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया घेतल्या़ यावेळी पिंपळगाव माळवीचे सरपंच संतोष झिने, डोंगरगणचे सरपंच कैलास पटारे, ग्रामंपचायत सदस्य एकनाथ गुंड, विश्वनाथ गुंड, योगेश झिने, बापू बेरड, नानासाहेब झिने, भास्कर जाधव, अजित बोरा, डॉ़ महावीर बोरा आदी उपस्थित होते़ ़़़़़़़़़आम्ही शेतीतील काम बुडवून येथे आलो़ आमचा वेळ गेला़ मात्र, मोदींशी संवाद न झाल्याने नाराजीच पदरात पडली़-गोरख आढाव, ग्रामस्थ़़़़़़़़़़़़शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना अतिशय वाईट दिवस आले आहेत़ मोदी आमच्याकडून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतील, असे वाटले होते़ पण त्यांनी आमच्याशी संवाद साधलाच नाही़-नानासाहेब झिने, ग्रामस्थ़़़़़़़़़़़उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली़ त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, अशी विनंती आम्ही पंतप्रधानांना करणार होतो़ परंतु त्यांच्याशी आमचा संवाद झालाच नाही़-संदीप झिने, ग्रामस्थ