शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १0 मोठय़ा शहरांमध्ये होणार ‘महानगर ब्लड बँक’

By admin | Updated: June 14, 2014 23:37 IST

नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, परभणी, पुणे, सातारा, ठाणे या मोठय़ा शहरांचा समावेश आहे.

अकोला : रक्तदान म्हणजे सर्व श्रेष्ठ दान! रक्तदान केल्याने कित्येक जणांचा जीव वाचविला जाऊ शकतो. या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला तेव्हा येतो जेव्हा कुणी आपली व्यक्ती रक्ताअभावी जीवन आणि मृत्यूच्या दारात संघर्ष करीत असते. खडबडून झोपेतून जागे होऊन आपण त्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी रक्त मिळविण्यासाठी प्रयत्न करू लागतो. दुर्घटनेमुळे किंवा आजारपणाने आपल्यापैकी कुणीही या परिस्थितीचा बळी ठरू शकतो. याच कारणास्तव मुंबईच्या धर्तीवर राज्यातील १0 मोठय़ा शहरांमध्ये ह्यमहानगर ब्लड बँकह्ण तयार करण्यात येत आहे. याचा लाभ त्या शहरांजवळील लहान गावांनादेखील घेता येणार आहे. राज्यात शासकीय स्वास्थ्य विभागाव्यतिरिक्त इतर सेवाभावी संस्थादेखील रक्त संकलनाचे काम करतात. यामुळेच कदाचित रक्त संकलन करण्यात देशात महाराष्ट्राचा पहिल्या क्रमांक लागतो. वर्ष १९९७ मध्ये २.५ लाख रक्त शिबिरांच्या माध्यमातून राज्यात ३ लाख ६0 हजार युनिट रक्त साठा संकलित करण्यात आला होता. याचप्रकारे प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्यात २0१३ मध्ये १४ लाख ७५ हजार युनिट रक्त संकलित करण्यात आले होते. यातील २२ हजार युनिट रक्तसाठा शिबिरांच्या माध्यमातून संकलित करण्यात आला होता. प्रशासनाच्या व स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या प्रयत्नामुळेच महाराष्ट्राचे नाव आणखी उंच शिखरावर पोहोचल्याचे यावरून सिद्ध होते. राज्यातील रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबईत ह्यमहानगर ब्लड बँकह्ण निर्माण करण्यात आली आहे. या महाबँकेतून वर्ष २0१४ मध्ये १ लाख युनिट रक्ताचे वितरण करण्यात आले आहे. राज्यातील इतर शहरांची रक्ताची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य रक्त संकलन परिषद मुंबईच्या वतीने लवकरच १0 मोठय़ा शहरांमध्ये महानगर ब्लड बँक निर्माण करण्यात येणार आहे. यात नाशिक, अहमदनगर, जळगाव, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, परभणी, पुणे, सातारा, ठाणे या मोठय़ा शहरांचा समावेश आहे. राज्यात सध्या ३00 ब्लड बँकांच्या माध्यमातून रक्त संकलन केले जाते. त्यासाठी २२0 रक्त घटक केंद्र कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी राज्यात १५0 ठिकाणी स्टोअरेज सेंटर्स कार्यरत आहेत. ह्यब्लड ऑन कॉलह्ण ही संकल्पना साकार करण्यासाठी प्रारंभ करण्यात आलेल्या ह्यजीवन अमृत सेवाह्णसाठी १0४ क्रमांक डायल करून रक्त प्राप्त करता येते. ७ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आलेल्या या सेवेचा आजतागायत ७ हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. यात ५ हजार लोकांना रक्त वितरित करण्यात आले, तर २ हजार लोकांनी रक्त आरक्षित करून ठेवले आहे. रक्त संकलन अधिकारी व अन्य अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी देशातील पहिले प्रशिक्षण केंद्र मुंबईतील खारघरमध्ये सुरू करण्याची योजनादेखील रक्त संकलन परिषद मुंबईने आखली आहे.

** रक्तदान करण्यात महिला पिछाडीवर

आज प्रत्येक क्षेत्रात पुढे असलेला महिला वर्ग रक्तदान करण्यात पुरुषांपेक्षा पिछाडीवर आहे. इच्छा असूनदेखील त्या रक्तदान करू शकत नाहीत. रक्तदान करणार्‍या महिलांची आकडेवारी नाहीच्या बरोबरच आहे. असे नाही की, स्त्रीवर्ग रक्तदानाप्रती जागरूक नाहीत; पण प्रकृती स्वास्थ्याच्या तक्रारींमुळे इच्छा असूनदेखील त्यांना रक्तदान करता येत नसल्याची वास्तविक स्थिती आहे. अशक्त प्रकृतीमुळे महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ ग्रॅमपेक्षाही कमी राहते. परिणामी वजनदेखील कमी भरते. एक कारण असेही आहे की, सडपातळ बांधा ठेवण्यासठी डायटिंग करण्यामुळेदेखील अनेक महिला सकस आहारापासून वंचित राहतात. परिणामी रक्तदान करण्यासाठी आलेल्या अशा महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण व वजन कमी अढळते. रक्तदान करण्यासाठी स्त्रीचे वजन ४५ किलो, तर वय १८ ते ६0 च्या दरम्यात असणे गरजेचे आहे.