शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 05:56 IST

अहिल्यादेवींचा १०८ फूट उंचीचा पुतळा, शिल्पसृष्टी व ३५० मीटर लांब व ४० फूट रुंद नैसर्गिक बेट उभारले जाणार आहे.

- अशोक निमोणकर लोकमत न्यूज नेटवर्क जामखेड (जि. अहिल्यानगर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी (ता. जामखेड) येथे पर्यटक आणि इतिहासप्रेमींना आकर्षित करेल, त्यांचे कार्यकर्तृत्व सर्वांपर्यंत पोहोचेल, असा चौंडी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या सातशे कोटींच्या आराखड्यावर चोंडी येथे आज होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

अहिल्यादेवींचा १०८ फूट उंचीचा पुतळा, शिल्पसृष्टी व ३५० मीटर लांब व ४० फूट रुंद नैसर्गिक बेट उभारले जाणार आहे. अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास  शिल्पसृष्टीतून उलगडणार आहे.  अहिल्यादेवींचे माहेरचे नववे वंशज तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अहिल्यादेवींच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चोंडीला पर्यटनाचा दर्जा प्राप्त व्हावा यादृष्टीने ७०० कोटींचा विकास आराखडा तयार केला. १६ एप्रिलला मुंबईत विधान भवनात सभापती शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यात स्थापत्य विशारद किरण कलमदानी यांनी हा आराखडा सादर केला होता. 

७० एकर जमिनीवर स्मारकपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा १०८ फूट उंचीचा पुतळा सीना नदीपात्रात नैसर्गिक बेटावर उभारला जाईल. त्यामध्ये आठ महत्त्वाचे टप्पे असलेले समूह शिल्प पुतळ्यालगत उभारले जाईल. नदीपात्रात नैसर्गिक बेट आहे. या बेटावरील नियोजित पुतळ्यासमोरील नदीपात्रालगतच्या ७० एकर जमिनीवर स्मारक होणार आहे.

अहिल्यादेवींच्या कार्यातून प्रेरणा घेत, चोंडीमध्ये जलसंवर्धन, वृक्षारोपण, पर्यावरण स्नेही रचना आणि पारंपरिक शैली यांचा समन्वय साधून एक मॉडेल गाव उभे करण्याचा मानस आहे.  प्रा. राम शिंदे, सभापती, विधान परिषद

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस