शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 10:30 IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहे.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी सभांचा धडाका सुरू केला आहे. काल अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी जामखेडमध्ये सभा झाली. या सभेत आमदार सुरेश धस यांनी खासदार शरद पवार, आमदार रोहित पवार, निलेश लंके यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आमदार धस यांचे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

"राजकारणात नवीन पायंडा पडू देऊ नका, काम कमी आणि व्हॉट्सअप फेसबुक जास्त. असा सध्या जमाना येत आहे. कोविडच्या काळात आम्ही १३ हॉस्पिटल आणि ३४ कोविड सेंटर आम्ही चालवली. हे करत असताना आम्हाला त्याच व्हॉट्सअप आणि फेसबुकवर रिल करायला वेळ मिळाला नाही,  पण आजकालचा जमाना असा झाला आहे, असा टोला आमदार सुरेश धस यांनी निलेश लंके यांना लगावला. "कोविड काळात सुजय विखे पाटील यांनी चांगलं काम केलं. त्यांनी पाहिडे तेवढी औषध आणली. आजही त्यांच्याकडे रुग्ण उपचार घेऊन येतो. पण त्यावेळी जे सरकार होतं ते फक्त फेसबुक लाईव्ह सरकार होतं,त्यांनी त्यावेळी तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी एवढच केलं, अशी टीका सुरेश धस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

आमदार सुरेश धस म्हणाले, राज्यात पक्ष फोडण्याची सुरुवात भाजपाने केली. एकत्र लढले आणि शेवटला राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेले. धोका यांनीच आम्हाला दिला आहे.आमच्या पाठीत खंजीर यांनीच खुपसला, असा आरोपही धस यांनी केला.

'बारामतीच घर फुटल्यावर कसं काय वाईट वाटतं' 

यावेळी आमदार सुरेश धस यांनी खासदार शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. "राज्यात दुसरा एक पक्ष आहे त्यांचं उभ आयुष्य पक्ष फोडण्यात गेलं. त्यांचं आयुष्य पक्ष फोडण्यात नाही तर घर फोडण्यातही गेलं आहे. मग आता तुमच घर फुटलं तुम्हाला का वाईट वाटतं, मोहिते पाटील यांचं घर फोडलं, गोपीनाथ मुंडेंचं घर फोडलं महाराष्ट्रातील कोणाच घर राहिलं ते सांगा. मग आता बारामतीच घर फुटल्यावर कस काय वाईट वाटत आहे, अशी टीका शरद पवार यांचं नाव न घेता सुरेश धस यांनी केली.  

"बारामतीमध्ये भाजपाच्या मदतीने घड्याळ निवडून आलं आहे, असं माझं ठाम मत आहे. ते आदल्या दिवशीच कळालं आहे. इलेक्शनच्या आधी दोन दिवस जे पक्ष रडारडी करतात त्या पक्षाच दोन दिवसांनी काय होणार आहे हे कळतं, असा निशाणा रोहित पवार यांच्यावर लगावला. मतदानादिवशी बारामतीमधील उमेदवार अजितदादांच्या मातोश्रींना भेटायला गेले, मग याआधी का भेटायला तुम्ही गेला नाहीत, असा सवालही सुरेश धस यांनी केला. 

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४