मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्त्या वसुधा सरदार, ॲड. गवांदे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले.
गवांदे म्हणाल्या, २७ मे रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्यात आली. या जिल्ह्यात सहा वर्षापासून दारूबंदी लागू करण्यात आली होती. यासाठी सूज्ञ नागरिक व महिलांकडून मोठ्या संख्येने दीर्घकालीन लढा देण्यात आला. लाखो महिलांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करत दारूबंदीची मागणी केली होती. याची दखल घेऊन दारुबंदी लागू करण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अट्टाहासी भूमिकेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी हटविण्याचा घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व सध्या महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री असलेले विजय वडेट्टीवार यांनी भारतीय राज्य घटनेतील मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात जिल्ह्यात दारूबंदी उठविण्याचे आश्वासन देत निवडणूक लढवली होती. याबद्दल त्यांना योग्य समज देण्याऐवजी विद्यमान महाविकास आघाडी सरकार आल्यावर २८ फेब्रुवारी २०२१ मध्ये दारूबंदी उठविण्याचा निर्णय परिपत्रक काढून घेतला आहे. हा निर्णय शासनाला मागे घ्यायला लावला पाहिजे. राज्यात व्यसनमुक्ती धोेरणांची अंमलबजावणी करावी.