शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
4
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
5
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
6
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
7
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
8
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
9
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
10
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
11
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
12
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
13
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
14
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
15
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
16
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
17
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
18
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
19
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
20
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
Daily Top 2Weekly Top 5

पाच उमेदवारांचे ‘सीमोल्लंघन’

By admin | Updated: September 28, 2014 23:27 IST

अहमदनगर : स्वतंत्र मतदारसंघ नसतानाही नगर तालुक्यातील पाच उमेदवारांनी हक्काच्या मतांची गोळाबेरीज करीत इतर मतदारसंघात ‘सीमोल्लंघन’ केले

अहमदनगर : स्वतंत्र मतदारसंघ नसतानाही नगर तालुक्यातील पाच उमेदवारांनी हक्काच्या मतांची गोळाबेरीज करीत इतर मतदारसंघात ‘सीमोल्लंघन’ केले आहे. तालुक्यातील सर्वपक्षीय मतांची मोट बांधून ‘राहुरी पॅटर्न’ पारनेर व श्रीगोंदा मतदारसंघात राबविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यात कोण-कोण बाजी मारील हे मतदारच ठरवणार आहेत.नगर तालुक्यातील अवघ्या ४० हजार मतांच्या जोरावर भाजपाचे राहुरीचे आ. शिवाजी कर्डिले यांनी मागील वेळी राहुरीचा गड जिंकला. नगर तालुक्याचे स्वतंत्र अस्तित्व उरले नसल्याने इतर मतदारसंघातही हा प्रयोग करत यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी नगर तालुक्यातील ७५ हजार मतांची शिदोरी घेत श्रीगोंद्यात शिवसेनेकडून प्रस्थापितांविरोधात आव्हान उभे केले आहे. नगर तालुक्यातील मतांची विभागणी करण्यासाठी वाळकी गटाचे जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ यांना काँग्रेसकडून रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न झाले, मात्र हराळ यांनी ‘आपली तयारी नसल्याचे’ कारण देत हे प्रयत्न हाणून पाडले. आ. कर्डिले यांच्याही नगर तालुक्यातील मतात विभागणी करण्यासाठी सुरुवातीला गोविंद मोकाटे यांनी अपक्ष तर अखेरच्या क्षणी काँग्रेसकडून राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांना उमेदवारी दिली गेल्याने या मतदारसंघात नगर तालुक्यातील तीन उमेदवार राहिले आहेत. उमेदवारी अर्ज कोण माघारी घेतो याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी नगर तालुक्यातील किती मतांची फाटाफूट होईल याची चर्चा रंगत आहे. पारनेरमधूनही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत माधवराव लामखडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणत्याही पक्षांची उमेदवारी नाकारून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात नगर तालुक्यातील सर्वाधिक ९५ हजार मतदार आहेत. येथे शिवसेनेची ताकद असली तरी ही ताकद सध्या प्रा.गाडे यांच्या दिमतीला श्रीगोंद्यासाठी तैनात झाली आहे. यामुळे लामखडे सर्वपक्षीय कार्यकर्ते गळाला लावण्याच्या प्रयत्नात आहेत. कर्डिले यांनी राहुरीतून जशी नगर तालुक्यातील एकतर्फी मते मिळवली तशी आपल्याला मिळतील या तयारीत लामखडे यांची चाचपणी सुरू आहे. पारनेरमधील काही नाराजांशी त्यांचा संपर्क सुरू आहे. तर भाजपाचे बबनराव पाचपुते हेही नगर तालुक्यातील मतदानावर डोळा ठेवून आहेत. श्रीगोंद्यातील उमेदवारांची भाऊगर्दी पाहता गाडे यात किती यशस्वी होतील हे निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. कर्डिले यांच्या विरोधात राहुरीतून एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न युती व आघाडी तुटल्याने अपयशी झाल्याने कर्डिले यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. (प्रतिनिधी)