शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयात स्टेटससाठी येऊ नका; जनतेची कामे घेऊन या : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 06:37 IST

Devendra Fadnavis : भाजपची सदस्य नोंदणी ४३ लाख झाली आहे, २० जानेवारीपर्यंत ती दीड कोटींवर न्या, असे आवाहन फडणवीस यांनी केले. 

शिर्डी : मंत्रालयात जनतेच्या हिताची कामे घेऊन जरूर या, पण स्टेट्स सिम्बॉल म्हणून येऊ नका. आपली संस्कृती वेगळी आहे, अशा शब्दात कान टोचत  सरकार आणि पक्ष यांच्यात सेतू म्हणून काम करा आणि सरकारची कामे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे आयोजित भाजपच्या प्रदेश अधिवेशनात पक्षजनांना केले. 

आगामी शंभर दिवसांत करावयाच्या कामांकडे लक्ष्य दिले आहे. सरकारचा कारभार पारदर्शक आणि प्रामाणिक राहील. त्यासाठी आपल्याला भाजप पक्षसंघटनेची साथ लागेल. ‘श्रद्धा, सबुरी’चा अर्थ समजून घ्या. हा अर्थ ‘राष्ट्र प्रथम, अंत मे मै’ या भाजपच्या ब्रीदवाक्यातही आहे. ज्यांना तो समजला नाही, त्यांची अवस्था वाईट झाली, असा चिमटा फडणवीस यांनी काढला. भाजपची सदस्य नोंदणी ४३ लाख झाली आहे, २० जानेवारीपर्यंत ती दीड कोटींवर न्या, असे आवाहन फडणवीस यांनी केले. 

शिंदे, पवारांना घेऊनच वाटचाल एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन नेत्यांना सोबत घेऊनच महायुतीची वाटचाल सुरू राहील. रिपाइंसारख्या लहान पक्षांनाही सोबतच ठेवू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.  

व्होट जिहाद २चे आव्हानमालेगावमधील बांगलादेशी घुसखोरांच्या प्रकरणाचा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मालेगाव, अंजनगाव  यासारख्या ठिकाणी एकेका दिवसात ५०-६० जन्माचे दाखले दिले गेल्याचे समोर आले आहे. हे व्होट जिहाद पार्ट २ आहे आणि त्याचा बीमोड करावाच लागेल, एकाही घुसखोराला देशात ठेवता कामा नये. जात - पंथावरून दुफळी कशी माजेल, याचा प्रयत्न अराजकतावादी शक्ती करत आहेत. त्यांच्याविरूद्धची आमची लढाई सुरूच राहील. विधानसभा निवडणुकीत आमचे नेते नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला, साधूसंतांच्या आशीर्वादाने भगवी लाट निर्माण झाली, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाshirdiशिर्डी