या सामाजिक उपक्रमाचे हे ३४ वे वर्ष असून, माजी नगरसेवक रुपसिंग कदम यांच्या पुढाकारातून दरवर्षी ख्रिसमसला गरजूंना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी द. स. पारगे, उबेद शेख, बाळासाहेब भुजबळ, माजी नगरसेविका शैला कदम, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय लोखंडे, नगरसेविका पारगे, कादिर शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष साहेबान जहागीरदार, शहानवाझ शेख, हुसेन शेख, विजय साठे, राजू गायकवाड, हाजी फिरोज खान, नदिम मोमीन, श्रीकांत पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभू येशु चरणी प्रार्थना करण्यात आली.
...........
मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे. दीन-दुबळ्यांना मदत केल्याने जीवनात सुख-समृध्दी नांदत असते. गरजूंना आधार देण्यासाठी माजी नगरसेवक रुपसिंग कदम विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. वाढत्या थंडीची तीव्रता लक्षात घेवून जवान मित्र मंडळाने घेतलेल्या उपक्रमातून गरजूंना ऊब मिळणार आहे.
- संग्राम जगताप, आमदार
..........
२५ साजिद लिस्ट