शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डीत साईबाबांचरणी, गृहमंत्र्यांनीही घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 11:35 IST

जिल्ह्यातील कोपरगाव येथे सहकार महर्षी स्व. शंकरराव काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे

शिर्डी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे  शिर्डी विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेसुद्धा आगमन झाले. यावेळी उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले.

जिल्ह्यातील कोपरगाव येथे सहकार महर्षी स्व. शंकरराव काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या पुतळा अनावरण सोहळ्यापूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी शिर्डीच्या साईचरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, श्री.साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे,खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, संस्थानचे पदाधिकारी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत उपस्थित होत्या.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलshirdiशिर्डीsaibabaसाईबाबा