शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

बंधारा फुटला, पाझर तलाव खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 13:36 IST

शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथील सिमेंटचा बंधारा फुटला आहे. तर चेडे चांदगाव शिवारातील पाझर तलावाची भिंत मधोमध खचली आहे.

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील ठाकूर पिंपळगाव येथील सिमेंटचा बंधारा फुटला आहे. तर चेडे चांदगाव शिवारातील पाझर तलावाची भिंत मधोमध खचली आहे.

सध्याच्या पाण्याच्या प्रवाहाने आजुबाजूच्या शेतीला तसेच लोकवस्त्यांना धोका संभवू शकतो. यामुळे येथील माजी उपसरपंच अर्चना किशोर दहिफळे यांनी शुक्रवारी (दि.१६) जलसंधारणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देत दुरूस्तीची मागणी केली आहे. 

        ठाकूर पिंपळगाव येथे शेवगाव-गेवराई महामार्गालगत गोयकर वस्तीनजीक खटकळ नदीवर २०१६-१७ मध्ये एक सिमेंट बंधारा बांधण्यात आलेला आहे. अतिवृष्टीमूळे या बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. या बंधाऱ्याच्या सिमेंट भिंतीलगतचा पश्चिमेकडील काठ फोडून पाणी बाहेर ओसंडून वाहत आहे. पाण्याच्या जोर जास्त असल्याने बंधारा अक्षरशः उधडला आहे. 

चेडेचांदगाव शिवारात १९७२ च्या आसपास निर्मिती असलेल्या पाझर तलावाची मातीची भिंत मधोमध दबली गेलेली आहे. या पाझर तलावात सध्या ८० टक्के पाणी आहे. परंतु, जर तलाव काठोकाठ भरला तर सांडव्याऐवजी पाणी मधूनच बाहेर पडू शकते. याचा आजुबाजूच्या शेतीला तसेच लोकवस्तीला फटका बसू शकतो. या भीतीने परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत. 

मला जामखेड येथे थोडे काम आहे. सदरील भाग माझ्याकडेच आहे. त्याबाबत उद्या किंवा परवा पाहू, असे जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता यू.डी.कुमकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावRainपाऊसDamधरणWaterपाणी