शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी १८६५ कोटींचा निधी; CM फडणवीसांनी घेतले महत्त्वाचे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:07 IST

चौडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ११ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Choundi Cabinet Meeting: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने अहिल्यानगरच्या चौंडी येथे पहिल्यांदाच ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन केले होते. अहिल्यानगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीसाठी फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ चौंडी येथे उपस्थित होते. या मंत्रिमंडळ बैठकीत  सरकारने  महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यावेळी राज्यातील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी ५५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडीमध्ये मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. चौंडीला अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळासाठी ६८१ कोटींचा आराखडा मान्य करण्यात आली. या प्रकल्पातून स्मृतीस्थळाला अखिल भारतीय स्तरावरील प्रेरणास्थळ आणि तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे तसेच अहिल्यानगर येथे नवे वैद्यकीय महाविद्यालय तर मुलींसाठी विशेष आयटीआय सुरू करण्यात येणार आहे. 

मंत्रिमंडळ बैठकीतील ११ महत्त्वाचे निर्णय

१) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची शासनामार्फत निर्मिती करणार- महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार- व्यवसायिक चित्रपट असल्याने लागणारा खर्च हा अर्थसंकल्पीय मागण्यांतून उपलब्ध करुन देणार

२) राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणार/आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार- राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणार. अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि चळवळ निर्माण करणार- कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे, लिंगभेदात्मक बाबी दूर सारत मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, बालविवाहमुक्त समाजनिर्मिती, लैंगिक-शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करुन हिंसाचारमुक्त कुटुंब आणि समाजनिर्मिती, अनिष्ठ रुढींचे निर्मूलन, महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी यातून आर्थिक विकास- हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणार्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देणार- हे अभियान राबविण्यासाठी १०.५० कोटी रुपये खर्च करणार

3) धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव.‘यशवंत विद्यार्थी योजना’ म्हणून ही योजना आता राबविणार- दरवर्षी १०,००० विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण- आतापर्यंत यासाठी २८८.९२ कोटी रुपये वितरित- राजे यशवंतराव होळकर यांनी १७९७ ते १८११ या काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली. गुरुकुलसारख्या पारंपारिक शिक्षणाला चालना दिली. लष्करी शिक्षणात शिस्त, नीती आणि नेतृत्त्वगुणांचा समावेश केला. शिक्षण सर्वांसाठी खुले केले. राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या. आता त्यांच्या नावे ही योजना

४) धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतीगृह बांधण्याच्या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव- राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह- प्रत्येकी २०० क्षमतेची ही वसतीगृह असणार. यात मुलांसाठी १०० क्षमतेचे तर, मुलींसाठी १०० क्षमतेचे.- नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतीगृह- नाशिक येथे काम सुरु, पुणे, नागपूर येथे लवकरच सुरु होणार- या वसतीगृहांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव

५) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी, पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करुन त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविणार- राज्यात असे ३ ऐतिहासिक तलाव (चांदवड, त्र्यंबकेश्वर, मल्हार गौतमेश्वर, जेजुरी)- राज्यात अशा १९ विहिरी- राज्यात असे एकूण ६ घाट- राज्यात असे एकूण ६ कुंड- अशा एकूण ३४ जलाशयांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन, सुशोभिकरण इत्यादी कामे करणार- यासाठी ७५ कोटी रुपये खर्च करणार

६) अहिल्यानगर जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करणार- या महाविद्यालयाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव असेल.- यासाठी ४८५.०८ कोटी खर्च करणार- जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा, मनुष्यबळासह यासाठी देणार

७) राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून ५५०३.६९ कोटी रुपयांचे मंदिर विकास आराखडे- चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन : ६८१.३२ कोटी- अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार: १४७.८१ कोटी- श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा : १८६५ कोटी- श्री क्षेत्र ज्योतीबा मंदिर विकास आराखडा : २५९.५९ कोटी- श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा: २७५ कोटी- श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा :१४४५.९७ कोटी- श्री क्षेत्र माहुरगड विकास आराखडा : ८२९ कोटी

८) अहिल्यानगर येथे मुली आणि महिलांसाठी नवीन आयटीआय सुरु करणार

९) राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे दिवाणी न्यायालय, वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय

१०) ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मिशन महाग्राम कार्यक्रमाचा कालावधी २०२२-२५ ऐवजी २०२८ पर्यंत वाढविण्याचा निर्णय

११) नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधीकरण अध्यादेश-२०२५ जारी करण्याचा निर्णय 

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस