भानुदास मुरकुटेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल; राहुरी पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 10:16 IST2024-10-08T10:15:19+5:302024-10-08T10:16:02+5:30

सोमवारी रात्री घरातून ताब्यात घेतले 

Case of torture filed against Bhanudas Murkute; Arrested by Rahuri police | भानुदास मुरकुटेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल; राहुरी पोलिसांनी केली अटक

भानुदास मुरकुटेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल; राहुरी पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान मुरकुटे यांना श्रीरामपूरातील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेत याप्रकरणी अटक केली आहे.

राहुरी तालुक्यातील मांजरी येथील महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी फिर्याद दाखल केली. मुरकुटे हे रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात दाखल झाले. ते कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. रात्री साडेअकराच्या दरम्यान राहुरी पोलिस त्यांच्या निवासस्थानी आले. यानंतर त्यांना पोलिस ठाण्यात चौकशीनंतर अटक करण्यात आली.
अटकेनंतर रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याची त्यांनी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे.
 

Web Title: Case of torture filed against Bhanudas Murkute; Arrested by Rahuri police