शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 08:41 IST

चोंडी येथील मंत्रिमंडळ बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू होती.

अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त २९ एप्रिल रोजी चोंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक होणार होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २४ एप्रिल रोजी मुंबई दौरा असल्याने चोंडीतील बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे २९ एप्रिल ऐवजी ६ मे रोजी बैठक होणार आहे.

जिल्हा प्रशासनाची चोंडी येथील बैठकीसाठी युद्धपातळीवर तयारी सुरू होती. बैठकीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी विभागनिहाय बैठक घेऊन अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटपही केले होते. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील तयारीचा आढावा घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिलपासून मुंबईत सुरू होणाऱ्या इंडिय स्टील-२०२५ कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात विविध व्यावसायिक, उद्योगपती आणि राज्याचे प्रतिनिधी, सरकारी अधिकारी, इतर देशांचे प्रतिनिधी मंडळ आदी सहभागी होणार आहेत. त्यामुळे बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मंत्रिमंडळ बैठकीत विकासाला मिळेल चालनाराज्य मंत्रिमंडळ बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ला संवर्धन, श्रीगोंदा येथील पेडगाव किल्ला येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक, जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा या विषयांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAhilyanagarअहिल्यानगर