घरोघरी जाऊन सोयाबीन खरेदी करणाऱ्यांपासून सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:15+5:302021-09-25T04:21:15+5:30

शेतकऱ्यांना ही चूक लक्षात येत नाही. शेतीमालाची खरेदी करण्यासाठी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची परवानगी घेणे आवश्यक असते. काही ...

Beware of soybean buyers going from house to house | घरोघरी जाऊन सोयाबीन खरेदी करणाऱ्यांपासून सावधान

घरोघरी जाऊन सोयाबीन खरेदी करणाऱ्यांपासून सावधान

शेतकऱ्यांना ही चूक लक्षात येत नाही. शेतीमालाची खरेदी करण्यासाठी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीची परवानगी घेणे आवश्यक असते.

काही अटींची पूर्तता करून लायसन्स घेणे गरजेचे असते, असे कोणी करत नाही. अनधिकृत व्यापारी सोयाबीन खरेदी केल्यावर पक्के बिल देत नाही. कोऱ्या कागदावर लिहून देतात. वेळेवर पेमेंट देत नाही. वेळोवेळी पैशाची मागणी केल्यास अरेरावीची भाषा वापरली जाते. यावेळी शेतकऱ्याने कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार नोंदवावी. कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागात अशा अनधिकृत व्यापाऱ्यांची

संख्या वाढली आहे. अशा फसव्या व्यापाऱ्यांपासून सावध रहा व असा गैरव्यवहार करतांना व्यापारी आढळल्यास लगेच बाजार समितीस कळवावे

........................

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समितीच्या ज्या व्यापाऱ्यांनी भुसार मालाचे लायसन्स काढले असेल त्यांना लवकरच भुसार मालाचा लिलाव चालू करण्याच्या सूचना देण्यात येतील व जे व्यापारी भुसार मालाचे लायसन्स नसताना भुसार माल खरेदी करतांना आढळले किंवा असे कळाले तर, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

- नामदेव ठोंबळ, प्रशासक, कोपरगाव बाजार समिती

Web Title: Beware of soybean buyers going from house to house