शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेत बाजरी होतोय इतिहास जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

अकोले : आधुनिक तंत्रज्ञान, संकरित बियाणे ही शेतीमध्ये काळाची गरज बनली आहे. पीक पद्धतीत झालेल्या बदलाने तालुक्यातील खरीप हंगामातील ...

अकोले : आधुनिक तंत्रज्ञान, संकरित बियाणे ही शेतीमध्ये काळाची गरज बनली आहे. पीक पद्धतीत झालेल्या बदलाने तालुक्यातील खरीप हंगामातील बाजरीचे क्षेत्र कमालीच घटत चालले आहे. त्यामुळे भविष्यात अकोले तालुक्यात बाजरी पीक इतिहास जमा होण्याची भीती निर्माण झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून बाजरीच्या रानात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. उसाच्या अगोदर तालुक्यात जवळपास १५ ते १६ हजार हेक्टरवर खरीप हंगामात बाजरी पीक घेतले जायचे. यंदा तालुक्यात केवळ सातशे हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. किमतीत वाढ न झाल्याने बाजरी पीक परवडत नाही. दुसरीकडे तेलाच्या किमती गगनाला भिडल्याने सोयाबीनचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. यंदा सोयाबीनचे क्षेत्र पाच हजार हेक्टरच्या जवळपास गेले आहे.

एखाद्या शेतकऱ्याने बागायती क्षेत्रात बाजरी पेरली तर पाखरे ती टिकू देत नाहीत. परिणामी तालुक्यातील पूर्व भागातील बागायती क्षेत्रात बाजरी पीक शिवारात दिसेनासे झाले आहे.

विदर्भ मराठवाड्यात वातावरणानुसार ज्वारी प्रामुख्याने असायची. जीवनशैली बदलल्याने पीक पद्धती बदलली. आहारात तेलाचे प्रमाण वाढून चमचमीतपणा आला. फास्ट फूडच्या जमान्यात सकस आहारातील तृणधान व कडधान्ये मागे पडली. पूर्वी हंगामानुसार सात्त्विक आहार घेतला जात असे. श्रावणात आहारात प्रामुख्याने पालेभाज्या असायचा. आषाढात कष्टाच्या कामाच्या वेळी मांसाहार, तर उन्हाळ्यात ज्वारी, भात असे हलकेच अन्न असायचे.

...............

बदलती जीवनशैली, आहारात आलेले फास्ट फूड, रासायनिक खते, कीटकनाशक फवारणीतून तयार होणारे अन्नधान्य, भाजीपाल्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. पुढील धोका लक्षात घेऊन पुन्हा पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळावे लागेल.

- डाॅ. अभिजित दत्तात्रय फापाळे, लिंगदेव.

.................

एकेकाळी खरीप हंगामातले मुख्य पीक असलेल्या बाजरी पिकाने यंदा माझ्या गावचा शिवार सोडला आहे. शेतकऱ्यांना हे पीक परवडत नाही. बाजरीची जागा सोयाबीनने घेतली. कोणी बाजरी पेरली तर पाखरे पीक खाऊन टाकतात. तालुक्यातल्या प्रवरा परिसरातल्या गावांत बाजरीचे शेत शोधावे लागते. पीक पद्धती बदलल्याने बाजरी हद्दपार झाली आहे.

- भाऊसाहेब सखाराम चासकर, बहिरवाडी

.................

पेरणीसाठी ट्रक्टर अन् निंदणीसाठी तणनाशक

पूर्वी नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी, निंदणी, गोफणगुंडा घेऊन राखण, कापणी, वाहणी, खळ्यावर सुडी, मग हिवाळ्यात मोडणी, मळणी अन् मग बाजरीची रास तयार व्हायची. शेतकरी कणगीत धान्य साठवून ठेवत. बहुतेक कामात इर्जिक असे.

आता बाजरी पेरली तर ट्रॅक्टरने, निंदणी टाळण्यासाठी तणनाशक, कणसे कापून लगेच मळणी यंत्रात, धान्य लगेच बाजारात विक्रीसाठी जाते.