शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब पवार यांचे निधन

By admin | Updated: September 28, 2014 23:27 IST

जामखेड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब निवृत्ती पवार (वय ८०) यांचे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हृदयविकाराने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.

जामखेड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब निवृत्ती पवार (वय ८०) यांचे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हृदयविकाराने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेल्या ५५ वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय होते. संघर्षशील नेतृत्व म्हणून ते जिल्ह्यात परिचित होते.दिवंगत बाबासाहेब पवार यांनी जामखेड तालुक्यातील नान्नजसारख्या ग्रामीण भागातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. नान्नज गावचे सरपंच, पंचायत समितीचे उपसभापती म्हणून तालुक्यात वलय निर्माण केले. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून २४ वर्षे काम केले. याच दरम्यान जि.प. अध्यक्ष होण्यासाठी त्यांना स्वपक्षाशी संघर्ष पत्करावा लागला होता. त्यात ते यशस्वी झाले. जिल्हा दूध संघाचे संचालक व अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. जिल्हा दूध संघाच्या विभाजनानंतर त्यांनी तालुका दूध संघाची स्थापना करून जिल्ह्यात संघाला मानाचे स्थान मिळवून दिले. जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून १९९० च्या सुमारास तालुक्यातील पहिला सहकारी साखर कारखाना नान्नज येथे नंदादेवी नावाने काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राज्याचे तत्कालीन सहकारमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या उपस्थितीत शेअर्सची विक्री करण्यात आली. मात्र मर्यादित शेअर्स विक्री झाल्याने कारखाना उभा करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. बाबासाहेब पवार यांच्या मागे मुलगा तुषार पवार व चार मुली, पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या स्नुषा वंदना पवार जिल्हा बँकेच्या संचालिका आहेत. (तालुका प्रतिनिधी)