शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संयमाचा आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 05:08 IST

प्रत्येक गोष्टीचा बहरण्याचा एक काळ असतो. तोच काळ भान ठेवून जपला तर काळ प्रत्येकाला जपण्यासाठी वचनबद्ध असतो.

- विजयराज बोधनकरसंयम आणि शांती ही मानवी जगण्यातली सर्वांत सुंदर गोष्ट आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे झाड. बिजातून जन्म घेताना आणि नकळत विस्तारत जाताना त्याच्या वाढत्या पसाऱ्याचा कुणालाही अंदाजसुद्धा येत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात बहरण्याचा काळ येत असतो.त्या त्या काळात तो तो माणूस बहरत जातो. यशाच्या पायऱ्या चढत जातो आणि संयम शांतीच्या मार्गावरच त्याचा प्रवासही सर्वांना सुखावह वाटत असतो. शांती आणि संयमाच्या दोरीलाच यशाच्या चाव्या बांधलेल्या असतात. प्रत्येक गोष्टीचा बहरण्याचा एक काळ असतो. तोच काळ भान ठेवून जपला तर काळ प्रत्येकाला जपण्यासाठी वचनबद्ध असतो. ज्ञानाच्या जाणिवेच्या परिक्रमेचासुद्धा एक कालावधी असतो. पृथ्वीवरच्या प्रत्येकाच्या बहरण्याचा कालावधी नियतीने ठरवून दिला आहे. म्हणून तर कुठल्याही नोकरीत अनुभवाच्या व्याप्तीनंतरच बढती मिळत जाते. कुठल्याही विषयाचे कौशल्य एकाएकी मिळत नसते. त्यासाठी संयमाने ज्ञानाचे ग्रहण करावे लागते़ जाणीव नावाची गोष्टसुद्धा फक्त पुस्तकी ज्ञानाचेच प्राप्त होत नसते. आजच्या तरुणाला प्रगतीसाठी संयम आणि शांतीची गरज आहे. यश मिळविण्यासाठी उमेदीच्या काळात तरी शॉर्टकट शोधू नये. जितका प्रदीर्घ प्रवास तितकी जाणिवेची श्रीमंती वाढताना दिसते. त्या त्या क्षेत्राच्या कालमर्यादेतच यश प्राप्त होण्याची शक्यता असते; आणि त्याचमुळे क्षेत्र असो कुटुंब असो त्यावर संयमाचा आणि शांतीचा आशीर्वाद असेल तर सुंदर जग आपल्या मुठीत आनंदाने यायला तयार असते़ तोच खरा सुखकारक जीवनप्रवास असतो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक