शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना हूरहूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

वाढीव मुदत २० डिसेंबरला संपणार असल्याने प्रशासनातर्फेही पुढील कारवाईची रणनीती सुरू झाली आहे. मुदत संपताच नवीन पदाधिकारी निवडीसंबंधी नोटीस जारी केली जाणार आहे. ही नोटीस जारी झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणे बंधनकारक असते.

ठळक मुद्देमुदतवाढीचा आदेश नाही : नागपूरच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची वाढीव १२० दिवसांची मुदत येत्या २० डिसेंबरला समाप्त होत आहे. मात्र अद्यापही नवीन मुदतवाढीचे आदेश न आल्याने सर्वच पदाधिकाऱ्यांना हूरहूर लागली आहे.पदाधिकाऱ्यांना अडीच वर्षांचा कार्यकाळ तीन महिन्यांपूर्वीच संपला होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना तत्कालीन राज्य सरकारने १२० दिवसांची वाढीव मुदत दिली होती. ही मुदत येत्या २० डिसेंबरला संपणार आहे. मात्र सर्वच पदाधिकाऱ्यांना आणखी तीन महिने मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. राज्यात नव्यानेच सरकार स्थापन झाल्याने मुदतवाढ नक्कीच मिळेल असा आशावाद पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाने या संबंधी सचिव स्तरावरून संबंधित अधिकाऱ्यांना वाढीव मुदतीचे तोंडी आदेश दिल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात एक सप्ताह लोटूनही मुदतवाढीचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले नाही.वाढीव मुदत २० डिसेंबरला संपणार असल्याने प्रशासनातर्फेही पुढील कारवाईची रणनीती सुरू झाली आहे. मुदत संपताच नवीन पदाधिकारी निवडीसंबंधी नोटीस जारी केली जाणार आहे. ही नोटीस जारी झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होणे बंधनकारक असते. मात्र ही नोटीस कधी निघणार याबाबत साशंकता कायम आहे. प्रशासनातर्फेही नोटीस नेमकी कधी काढली जाणार याची वाच्छता करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना वाढीव तीन महिने मुदत मिळण्याची आशा लागून आहे. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांची हूरहूर सुरु आहे. दरम्यान विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासक बसण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यामुळे पदाधिकारी संभ्रमावस्थेत आहे.सत्तेसाठी घोडेबाजाराचे संकेतसर्वाधिक २० सदस्य शिवसेनेकडून भाजपकडे १८, काँग्रेसकडे ११ अधिक एक तर राष्ट्रवादीकडे ११ सदस्य आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याने येथेही अशीच आघाडी निर्माण होण्याचे संकेत आहे. तथापि भाजपने अद्यापही सत्तेची आशा सोडली नाही. त्यामुळे नवीन पदाधिकारी निवडताना घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद