शेजाऱ्यांच्या बेदम मारहाणीत मारेगावातील युवकाचा मृत्यू़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 05:00 AM2021-10-15T05:00:00+5:302021-10-15T05:00:33+5:30

शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील लालसरे व वाढई या कुटुंबात ९ ऑक्टोबर रोजी वाद झाला. त्यानंतर पुन्हा ११ ऑक्टोबर रोजी या दोन कुटुंबात वादावादी होऊन हाणामारी झाली. मारहाणीत संजय वाढईच्या पोटातील आतडी फाटल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला प्रथम मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नंतर त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचार केल्यानंतर १३ ऑक्टोबरला उपचारादरम्यान संजयचा मृत्यू झाला. 

A youth from Maregaon died after being beaten to death by his neighbors | शेजाऱ्यांच्या बेदम मारहाणीत मारेगावातील युवकाचा मृत्यू़

शेजाऱ्यांच्या बेदम मारहाणीत मारेगावातील युवकाचा मृत्यू़

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या बेदम मारहाणीत येथील एका युवकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त मृताच्या नातलगांनी मारेगाव पोलीस ठाण्यात जाऊन मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करा, अशी मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात एका महिलेसह तिघांना बेड्या ठोकल्या. यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात येणार आहे. आरोपींमध्ये दोन मुले व त्यांच्या आईचा समावेश आहे. 
संजय लक्ष्मण वाढई (२७) असे मृताचे नाव आहे. शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील लालसरे व वाढई या कुटुंबात ९ ऑक्टोबर रोजी वाद झाला. त्यानंतर पुन्हा ११ ऑक्टोबर रोजी या दोन कुटुंबात वादावादी होऊन हाणामारी झाली. मारहाणीत संजय वाढईच्या पोटातील आतडी फाटल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला प्रथम मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने नंतर त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचार केल्यानंतर १३ ऑक्टोबरला उपचारादरम्यान संजयचा मृत्यू झाला.  या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणात सुरुवातीला हर्षल धनराज लालसरे (२३) याच्यासह एका अल्पवयीन आरोपीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. दरम्यान, शवविच्छदेनानंतर  गुरुवारी संजयचा मृतदेह मारेगावात आणण्यात आला. त्यानंतर मृताच्या काही नातलगांनी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणात आणखी काही आरोपी असून सर्वाना अटक करा, अशी मागणी केली. पोलिसांनी चौकशी करून रेखा धनराज लालसरे (४५) या महिलेलाही खुनाच्या गुन्ह्यात अटक केली.  या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून सर्व आरोपीवर कडक कारवाई करू, असे पोलिसांनी सांगितले.

मृत संजय आणि आरोपी हर्षल होते जिवलग मित्र 
- या प्रकरणातील मुख्य आरोपी हर्षल धनराज लालसरे व मृत संजय लक्ष्मण वाढई हे दोघेही शेजारी असून जिवलग मित्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून दोघेही मंडप डेकोरेशनचे काम एकत्र करायचे. परंतु काही दिवसांपासून दोघांत क्षुल्लक कारणावरून मतभेद झाले.  दोघांत वारंवार खटके उडत असत.  ११ ऑक्टोबर रोजी दोघांत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या संजयचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात येऊन रेखा धनराज लालसरे (४५) ही महिलाही या प्रकरणात सहभाग असून तिलाही अटक करा, अशी मागणी केली.  चौकशीअंती या प्रकरणात रेखासह एकूण तीन जणांविरूद्ध भादंवी ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. 
- संजय पुज्जलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी.
 

 

Web Title: A youth from Maregaon died after being beaten to death by his neighbors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.