शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी आज यवतमाळ बंद

By admin | Updated: June 5, 2017 01:15 IST

मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी असून शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही. उलट आत्ताच खरा संप पेटला आहे.

संप मिटला नाही पेटला : शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीची वज्रमूठलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी असून शेतकऱ्यांचा संप मिटलेला नाही. उलट आत्ताच खरा संप पेटला आहे. शेतकऱ्यांनी सोमवारी ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यवतमाळात हा बंद यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध संघटना एकवटल्या असून शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी सोमवारी कडकडीत यवतमाळ बंद पाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन समितीने पत्रकार परिषदेत केले.समितीचे निमंत्रक देवानंद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची २०१५ ची दुष्काळी मदत अद्याप दिली नाही. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही आश्वासनावर आमचा विश्वास उरला नाही. शेतकऱ्यांचा संप हा सर्व समाज व्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन केली. उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये आम्ही सहभागी असून यवतमाळात कडकडीत बंद पाळण्यात येईल. या समितीमध्ये लोकजागृती मंच, युवा शेतकरी संघर्ष समिती, विदर्भ राज्य आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, जनता दल युनायटेड महिला आघाडी, ओबीसी संघटना, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद, विदर्भ मुस्लिम मोर्चा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बेंबळा कालवेग्रस्त संघर्ष समिती, प्रहार, मुव्हमेंट फॉर पिस अँड जस्टीस, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, गोर सेना आदी संघटना सहभागी आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याला पाठिंबा दिला आहे. मात्र भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी सहभागी होण्यास नकार दिल्याची माहिती पत्रकार परिषदेत देवानंद पवार यांनी दिली. असे असेल आंदोलन सकाळी ८ वाजता बसस्थानक चौकात डॉ.आंबेडकर आणि नाट्यगृह परिसरातील शिवाजी महाराज, येरावार चौकात महात्मा फुले, जिल्हा परिषदेतील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले जाईल. या फेरीदरम्यान नागरिकांना आपापली प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन समिती करणार आहे.