शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस उपाध्यक्ष पदासाठी आग्रही का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 06:00 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी १३ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचे धोरण ठरले आहे. मात्र जागा वाटपाबाबत रस्सीखेच आहे. शिवसेनेच्या सर्वाधिक २० तर काँग्रेसच्या १२ जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा दहा सदस्यांचा गट आहे. याशिवाय आणखी एक सदस्य राष्ट्रवादीकडे आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : अधिक जागा असून उपयोग काय ?, महाविकास आघाडीच्या बैठकीवर नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीत दुसऱ्या क्रमांकाच्या अधिक जागा असताना काँग्रेस उपाध्यक्षपदासाठी आग्रही का नाही, हे पद राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यामागील सौजन्य काय, असा सवाल काँग्रेसच्या गोटात उपस्थित केला जात आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी १३ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्याचे धोरण ठरले आहे. मात्र जागा वाटपाबाबत रस्सीखेच आहे. शिवसेनेच्या सर्वाधिक २० तर काँग्रेसच्या १२ जागा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा दहा सदस्यांचा गट आहे. याशिवाय आणखी एक सदस्य राष्ट्रवादीकडे आहे. शिवसेनेचा अध्यक्ष पदावर दावा आहे. दुसºया क्रमांकाचे अधिक सदस्य असल्याने नियमानुसार उपाध्यक्ष पदावर काँग्रेसचा दावा असणे बंधनकारक आहे. या माध्यमातून जिल्हा परिषदेवर शिवसेना-काँग्रेसचा झेंडा फडकल्याचा संदेशही राज्यात जाईल. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण होईल. परंतु काँग्रेसचे काही नेते उपाध्यक्ष पदाबाबत केवळ बंगल्याला खूश करण्यासाठी बॅकफूटवर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याच कारणावरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसून येतो.अध्यक्ष पद शिवसेनेकडे जात असेल तर त्यांना सभापतीपद हे दुय्यम खात्याचे मिळावे, असा सूर आहे. हा पॅटर्न जिल्हा परिषदेतील सध्याच्याही सत्तेच्या रचनेत पहायला मिळतो. उपाध्यक्ष पद व एक महत्वाची समिती काँग्रेसकडे तर दोन सभापती पदे राष्ट्रवादीकडे असे समीकरण मांडले जात आहे. कमी जागा असताना राष्ट्रवादीसाठी तडजोड का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.दरम्यान जिल्हा परिषदेतील सत्तेचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी शनिवार ११ जानेवारी रोजी महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची गोपनीय बैठक होत आहे. यात कॉँग्रेसचे नेते उपाध्यक्ष पदासाठी आक्रमक भूमिका घेतात का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.असंतुष्टांच्या वेगळ्या समीकरणाला बसणार ‘चाप’शनिवारच्या बैठकीत यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील उमेदवाराबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र खरा फोकस जिल्हा परिषदेवर राहणार आहे. या बैठकीतच जिल्हा परिषदेच्या सत्तेतील वाटा निश्चित होणार आहे. स्थानिक पातळीवर वेगळे समीकरण मांडण्यासाठी सर्वच पक्षातील काही असंतुष्टांची धडपड दिसून येते. त्यामागे ‘अर्थ’कारणाची लालसा हा प्रमुख हेतू आहे. परंतु महाविकास आघाडीचीच सत्ता बसविण्याचे धोरण ठरल्याने या असंतुष्टांची कोंडी होण्याची चिन्हे आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद