शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव रोड बेसावध, एलसीबीने मारला हात

By admin | Updated: June 2, 2017 01:41 IST

गुन्ह्यांचे डिटेक्शन व आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. खुनातील गुन्ह्यात साहेबांनी मूळ टीप मिळविणाऱ्या पोलीस...

साहेबांच्या आदेशात गुरफटल्याचा फटका : डिटेक्शनसाठी रस्सीखेचसुरेंद्र राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुन्ह्यांचे डिटेक्शन व आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. खुनातील गुन्ह्यात साहेबांनी मूळ टीप मिळविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला गुंतवून ठेवल्याची संधी साधून स्थानिक गुन्हे शाखेनेच त्या आरोपीला अटक करून डिटेक्शनवर हात मारला. या बेसावधगिरीमुळे चिडलेल्या पोलिसांनी मग मेहनत आमची आणि तू भलत्याच्याच हाती का लागला म्हणून आरोपीलाच बाजीराव दाखविला जातो. स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव रोड पोलिसांमधील डिटेक्शनच्या स्पर्धेचे हे प्रकरण गुरुवारी पुढे आले. अप्रत्यक्ष एलसीबीची मदत करून साहेबांनी आपल्याच कार्यक्षेत्रात होऊ घातलेल्या कामगिरीवर पाणी फिरविल्याचे बोलले जाते. यवतमाळात शहर पोलीस ठाणे, वडगाव रोड, लोहारा आणि ग्रामीण पोलीस ठाणे, असे चार ठाणे आहेत. त्यांचे स्वतंत्र शोध पथक आहे. शिवाय उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अधिनस्त पथकातील कर्मचारीसुद्धा याच वर्तुळात काम करतात. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचेही तीन पथक आहे. टोळीविरोधी पथक तर संपूर्णपणे शहरातील गुन्ह्यांवरच लक्ष केंद्रीत करून आहे. स्थानिक गुन्हे शाखेशी संलग्नीत काही कर्मचारीही तपासावर काम करतात. त्यामुळे एकाच वर्तुळात अनेक शोध पथकांची गर्दी झाली आहे. एखादा गुन्हा घडला, की सर्व पथकातील एक अधिकारी व कर्मचारी सायबर सेलमध्ये ठाण मांडून बसतो. माहितगार कर्मचारी बाहेर फिरून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करतात. सायबर शाखेतून क्ल्यू मिळाला, की लगेच संपूर्ण यंत्रणा लोकेशनवर कामाला लागते. त्यामुळे गुन्हा तपासाची पद्धत सर्वांचीच सारखी झाली. यातूनच गुन्हा उघडकीस आणण्याची स्पर्धा रंगत आहे. ठाण्यातील शोध पथकांना तातडीने हालचाली करण्यासाठी साधन-सामुग्रीच्या मर्यादा येतात. त्या तुलनेत स्थानिक गुन्हे शाखेतील पथकांकडे पुरेसा वेळ असतो. त्यामुळे अनेक गुन्ह्यांमध्ये सुगावा लागूनही निर्णायक अटकेची कारवाई पोलीस ठाण्यातील शोध पथकाना करता येत नाही. परिणामी बरेचदा त्यांच्या तोंडचा घास हिरावल्याचे दु:ख कर्मचाऱ्यांना सोसावे लागते. हाच गुन्हेगार एलसीबीकडून पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला जातो. यामुळे त्या ठाण्यातील कर्मचारी त्याला बाजीराव दाखवितात.