शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

तस्करीत चोरीच्या वाहनांचा वापर

By admin | Updated: September 11, 2014 23:51 IST

यवतमाळ वनवृत्तातील जंगलांमधील परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून लाकूडसाठ्याच्या तस्करीची अनेक प्रकरणे गेल्या दोन महिन्यात पुढे आली. वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सारवासारवीचा केलेला

यवतमाळ : यवतमाळ वनवृत्तातील जंगलांमधील परिपक्व सागवान वृक्षांची कत्तल करून लाकूडसाठ्याच्या तस्करीची अनेक प्रकरणे गेल्या दोन महिन्यात पुढे आली. वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सारवासारवीचा केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. चौकशीत तस्करीसाठी वापरलेली वाहने ही चोरीतील असून नांदेड या वाहनांचे मुख्य केंद्र असल्याचे निष्पन्न झाले. मात्र या चोरट्या वाहनांचा आणि सागवान तस्करीचा मुख्य सूत्रधाराचे गुन्हेगारी जगतात मोठे नाव आहे. त्यामुळे मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला असून सागवान तस्करीचा तपास पुढे सरकत नसल्याचे दिसून येत आहे.हिवरी वनपरिक्षेत्रातील राखीव वनात दोनदा व घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा राऊंड आणि त्या पाठोपाठ पुसद वनपरिक्षेत्रातील खंडाळा तर आता घाटंजी तालुक्यातील कोपरा येथील महसुली जमिनीवर सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करीचे प्रकरण उघडकीस आले. एकापाठोपाठ घडलेल्या या गंभीर घटनांची यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांनी गंभीर दखल घेतली. त्यातूनच सारवासारव करणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षकांना निलंबित करण्यात आले. आता मात्र वनाधिकारी आणि कर्मचारी कारवाईच्या भीतीने खऱ्या अर्थाने सागवान तस्करांच्या शोधात लागले. संबंधित घटना उघडकीस आल्यानंतर आतापर्यंत घटनास्थळावरून तीन ट्रक जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान हे तिन्ही ट्रक चोरीतील असून त्यावर बनावट क्रमांक घातल्याचे निष्पन्न झाले. चोरीतील या वाहनांची पाळेमुळे खणून काढताना चोरीतील ही वाहने सागवान तस्कर नांदेड येथून खरेदी करतात. विशेष असे की विक्रेता त्यांना बनावट क्रमांकाचे दस्तावेजही तयार करवून देतो. त्यामुळे ही वाहने बिनदिक्कत रस्त्यावरून धावतात. चोरीतील वाहने अल्प किमतीत मिळत असल्याने ती पकडली गेल्यास अथवा जप्त झाल्यास तस्करांना फारसा फरक पडत नाही. चोरीतील वाहने नांदेड येथून त्यातही कुणामार्फत खरेदी होतात याचे धागेदोरे वन विभागाच्या हाती लागले आहे. तसेच वाहन खरेदीदारच सागवान तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. मात्र या सूत्रधाराचे नांदेड आणि मराठवाड्याच्या गुन्हेगारी जगतात मोठे नाव आहे. त्यामुळे त्याला अटक करावी कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)