कळंब तहसीलच्या कर्मचाऱ्यांची सहकाऱ्याला अनोखी श्रध्दांजली

By Admin | Updated: October 3, 2015 02:19 IST2015-10-03T02:19:56+5:302015-10-03T02:19:56+5:30

कामात राम शोधणाऱ्या आणि काम घेऊन येणाऱ्याला देव मानणाऱ्या सहकाऱ्याला येथील तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अनोखी श्रध्दांजली वाहिली.

Unique tributes to Kalam tahsil employees' helpers | कळंब तहसीलच्या कर्मचाऱ्यांची सहकाऱ्याला अनोखी श्रध्दांजली

कळंब तहसीलच्या कर्मचाऱ्यांची सहकाऱ्याला अनोखी श्रध्दांजली

सुटीच्या दिवशीही पूर्णवेळ काम : लिपिकाचा अपघाती मृत्यू
कळंब : कामात राम शोधणाऱ्या आणि काम घेऊन येणाऱ्याला देव मानणाऱ्या सहकाऱ्याला येथील तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अनोखी श्रध्दांजली वाहिली. एरवी कार्यालयात उशिरा पोहोचणारे आणि सुटीचा दिवस आनंदात घालविणारे कर्मचारी शुक्रवारी सुटी असूनही पूर्णवेळ कार्यालयात हजर राहून काम करीत होते. या कार्यालयातील कनिष्ठ लिपीक शालिग्राम कांडेलकर यांचा बुधवारी अपघाती मृत्यू झाला. त्यांना ही अनोखी श्रध्दांजली होती.
गुरुवारी आपले सहकारी शालिग्राम कांडेलकर यांचे निधन झाल्याची वार्ता सर्व कर्मचाऱ्यांना कळली. आपल्यातील एक सहकारी निघून गेल्याचे दु:ख प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होते. केवळ श्रध्दांजली अर्पण करून सोपस्कर पूर्ण करण्याऐवजी एक दिवस काम करून अनोखी श्रध्दाजंली वाहण्याचा निर्णय तहसीलदार संतोष काकडे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांजवळ बोलून दाखविला. त्यानुसार शुक्रवार सुटीच्या दिवशी शासकीय कामकाम करताना कर्मचारी दिसून आहे.
कांडेलकर हे अतिशय प्रामाणिक कर्मचारी होते. कुठलेही काम जेव्हाच्या तेव्हा पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असायचा. मन लावून काम करण्याची त्यांची हातोटी होती. त्यांनी यापूर्वी सैन्यात काम केले होते. त्यांच्या कामात कमालीची शिस्त पाहायला मिळायची. अशा कर्तव्यतत्पर माणसाला सुटीच्या दिवशीही दिवसभर काम करून श्रध्दाजंली अपर्ण करण्याचे ठरविले. यासाठी सर्वांनी सहकार्य केले, असे तहसीलदार संतोष काकडे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Unique tributes to Kalam tahsil employees' helpers