उद्धव ठाकरेंना ‘स्वामिनी’चे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 22:18 IST2017-08-08T22:18:07+5:302017-08-08T22:18:31+5:30

Uddhav Thackeray's 'Swaminarayan' request | उद्धव ठाकरेंना ‘स्वामिनी’चे निवेदन

उद्धव ठाकरेंना ‘स्वामिनी’चे निवेदन

ठळक मुद्देयवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची मोठ्या प्रमाणात मागणी होत असेल तर त्यात शिवसेना लक्ष घालेल,..

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची मोठ्या प्रमाणात मागणी होत असेल तर त्यात शिवसेना लक्ष घालेल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वामिनी दारूबंदी संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.
या शिष्टमंडळामध्ये संयोजक महेश पवार, मंगला कटकोजवार, प्रशांत भोयर, भावना नव्हाते, मनोज राठोड, शेखर सरकटे, सुनयना येवतकर यांचा समावेश होता. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यामार्फत स्वामिनी दारूबंदी संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी स्वामिनी शिष्टमंडळाकडून दारूबंदी समस्या जाणून घेतली आणि लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Uddhav Thackeray's 'Swaminarayan' request