शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा शहरात विषारी दारूचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST

गंभीर बाब म्हणजे पांढरकवडा पोलिसांचे अवैध धंद्यावरील नियंत्रण पूर्णत: सुटले असून अवैध व्यावसायिक सैराट झाले आहेत. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी अवैध दारूविक्री व मटक्यांचे अड्डे खुलेआमपणे सुरू असल्याने सामान्य नागरिकात कमालिचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी काही महिन्यांपूर्वी स्वत: मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन स्टींग ऑपरेशन केले होते.

ठळक मुद्देखुलेआम विक्री । पोलिसांचे अवैध धंद्यावरील नियंत्रण सुटले, मद्यपींचा उपद्रव वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : शहरात बनावट दारूचा शिरकाव झाला असून त्याची खुलेआम विक्री सुरू असल्याने मद्यपींचा जीव धोक्यात आला आहे. शहरात अनेक ठिकाणी गावठी दारूची जोमात विक्री सुरू असून ही दारू विषयुक्त असल्याचे सांगितले जाते.गंभीर बाब म्हणजे पांढरकवडा पोलिसांचे अवैध धंद्यावरील नियंत्रण पूर्णत: सुटले असून अवैध व्यावसायिक सैराट झाले आहेत. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी अवैध दारूविक्री व मटक्यांचे अड्डे खुलेआमपणे सुरू असल्याने सामान्य नागरिकात कमालिचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी काही महिन्यांपूर्वी स्वत: मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन स्टींग ऑपरेशन केले होते. त्यानंतर काही प्रमाणात अवैध धंद्यांवर आळा बसला होता. मात्र पुन्हा एकदा अवैध व्यावसायिकांनी डोके वर काढले आहे.शहरातील बसस्थानकासमोर आठवडी बाजार परिसरात, इंदिरानगर परिसरात खुलेआम गावठी दारू विकली जात आहे. दारू दुकाने उघडण्याची वेळ सकाळी १० वाजताची असताना मात्र शहरातील अनेक दुकाने पहाटे ५ वाजताच दारूविक्री सुरू करतात. त्यामुळे दुकानांसमोर मद्यपींची रिघ लागलेली असते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मात्र त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली जात आहे.येथे आहेत मटका अड्डेपांढरकवडा शहरातील ओम टॉकीज, आठवडी बाजार, इंदिरानगर, स्टेट बँक चौक, इंदिरा चौक, बसस्थानकासमोर खुलेआम मटक्यांचे अड्डे सुरू आहेत. हे मटका अड्डे पोलिसांना दिसत नाही काय, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरालगतच्या हॉटेल तसेच ढाब्यांवरूनदेखील अवैधरित्या दारूची विक्री केली जात आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी