टिपेश्वर ‘टायगर मोमेंट’ ! वाघीणीसह बछड्याचे दर्शन

By सुरेंद्र राऊत | Updated: May 5, 2026 18:09 IST2026-05-05T18:09:14+5:302026-05-05T18:09:56+5:30

Yavatmal : जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना मंगळवारी सकाळी वाघीणीसह बछड्याचे दर्शन झाल्याने सफारीचा अनुभव अविस्मरणीय ठरला.

Tipeshwar 'Tiger Moment'! Tiger cub seen with tigress | टिपेश्वर ‘टायगर मोमेंट’ ! वाघीणीसह बछड्याचे दर्शन

Tipeshwar 'Tiger Moment'! Tiger cub seen with tigress

यवतमाळ : जिल्ह्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना मंगळवारी सकाळी वाघीणीसह बछड्याचे दर्शन झाल्याने सफारीचा अनुभव अविस्मरणीय ठरला. उन्हाळी सुट्ट्यांमुळे आधीच गर्दी असताना, अचानक समोर आलेल्या या जोडीने काही क्षणांसाठी जंगलात रोमांचक वातावरण निर्माण केले. सफारीदरम्यान मुक्तपणे फिरणारी वाघीण आणि  तिचा बछडा दिसत पर्यटकांनी आनंद व्यक्त करत हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद केला. काही क्षणांसाठी सर्वत्र शांतता पसरली होती, तर पुढच्याच क्षणी उत्साहाची लाट उसळली.

उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जलस्रोतांच्या दिशेने वळत असल्याने अशा दर्शनांच्या घटना वाढत असल्याचे वनविभागाने सांगितले. दरम्यान, पर्यटकांनी जंगलातील नियमांचे पालन करून सुरक्षित अंतर राखणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 

Web Title : टिपेश्वर में बाघिन और शावक का अद्भुत दृश्य, पर्यटक रोमांचित!

Web Summary : यवतमाल के टिपेश्वर अभयारण्य में पर्यटकों को बाघिन और शावक दिखे, जिससे रोमांच हुआ। वन विभाग ने सुरक्षित दूरी बनाए रखने और नियमों का पालन करने की सलाह दी है।

Web Title : Tipeshwar Tiger Moment: Tigress and Cub Sighted, Thrilling Tourists!

Web Summary : Yavatmal's Tipeshwar sanctuary offered tourists a memorable tiger sighting. A tigress and her cub emerged during a safari, creating excitement. Forest officials advise maintaining a safe distance and following park rules.