शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टर जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

शासन दफ्तरी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सुमारे दहा दिवसांपासून वनपाल आणि वनरक्षक संपावर गेले आहेत. न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाणे हा त्यांचा अधिकार आहे.

यवतमाळ : शासन दफ्तरी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सुमारे दहा दिवसांपासून वनपाल आणि वनरक्षक संपावर गेले आहेत. न्याय्य मागण्यांसाठी संपावर जाणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र संप कालावधीत त्यांच्या ऐवजी वनरक्षणाचे काम कुणी करावे, याचे नियोजनच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले नाही. त्यामुळे यवतमाळ वनवृत्तातील हजारो हेक्टर जंगलाच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय लाकूड वाहतूकीची परवानगी मिळत नसल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहे. यवतमाळ वनवृत्तातील हिवरी वनपरिक्षेत्रांतर्गत मनपूर बिटमधील राखीव वनात दोनदा शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून तस्करीचा प्रयत्न उघड झाला. त्यापाठोपाठ घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा बिटमध्येही ट्रक फसल्याने राखीव वनातील शेकडो सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी उघड झाली. या घटनांची शाई वाळते न् वाळते तोच पुसद वनपरिक्षेत्रातही ट्रक फसल्याने सागवान लाकडांची तस्करी उघड झाली. वनाधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर असताना लाकूड तस्करीच्या एवढ्या गंभीर घटना घडल्या. आता तर एकट्या यवतमाळ वन विभागातील दीडशेवर वनकर्मचारी संपावर गेले आहेत. यवतमाळ वनवृत्तातील संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा तर एक हजारच्या घरात जातो. असे असताना वरिष्ठ स्तराहून जंगल संरक्षणासाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र तसे न झाल्याने हजारो हेक्टर राखीव जंगल वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. केवळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून जंगलात गस्त घालण्यात येत आहे. एकटा अधिकारी गस्त घालून करणार काय, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. संपाच्या कालावधीत सागवान कत्तल आणि तस्करीच्या घटना घडल्यास याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी पैशाची तजविज करण्यासाठी परवानगी काढून शेतातील सागवान वृक्षांची तोड केली. मात्र वनपाल आणि वनरक्षक संपावर असल्याने त्यांना वाहतूक पास मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)