शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीतील अर्धा किलो चांदीची ८०० रूपयांत विल्हेवाट

By admin | Updated: September 1, 2014 23:55 IST

एका जबरी घरफोडीत हाती लागलेली अर्धा किलो चांदीची चोरट्यांनी केवळ ८०० रुपयात विल्हेवाट लावली. विशेष म्हणजे चांदीचा बाजारभाव सध्या ४५ हजार रुपये किलो आहे. स्वस्तात मिळालेली ही चांदी

यवतमाळ : एका जबरी घरफोडीत हाती लागलेली अर्धा किलो चांदीची चोरट्यांनी केवळ ८०० रुपयात विल्हेवाट लावली. विशेष म्हणजे चांदीचा बाजारभाव सध्या ४५ हजार रुपये किलो आहे. स्वस्तात मिळालेली ही चांदी यवतमाळातील एका सुवर्ण कारागिराने खरेदी केली. मात्र हा प्रकार तीन विधी संघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या तावडीत सापडल्याने पुढे आला. शहर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने सोमवारी दुपारी त्या सुवर्ण कारागिराकडून ही चांदी जप्त केली. सुनील भरणे रा. बेंडकीपुरा यवतमाळ असे चोरीतील चांदी खरेदी करणाऱ्या सुवर्ण कारागिराचे नाव आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री येथील बालाजी चौकातील पुरूषोत्तम निमोदिया यांच्या घराचे दार तोडून रोख २५ हजार आणि ५०० ग्रॅम चांदीच्या वस्तू चोरीस गेल्या होत्या. याप्रकरणी ओमप्रकाश निमोदिया यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान घटनेच्या तब्बल सात महिन्यानंतर शहर गुन्हेशोध पथकातील सहाय्यक फौजदार गुलाब पंधरे, शिपायी रामेश्वर भिसे यांना त्या घरफोडीत तीन विधी संघर्षग्रस्त बालकांचा समावेश असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून सोमवारी सकाळी संशयित तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी निमोदिया यांच्याकडील घरफोडीची कबुली देऊन चोरीतील चांदी विक्रेत्याचे नावही पोलिसांपुढे उघड केले. त्यावरून अल्प किमतीत विक्री केलेली चोरीतील ५०० ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे बाजारात चांदीचा दर ४५ हजार रुपये किलो आहे. अत्यल्प किमतीत चांदी मिळाल्याने सुवर्णकारागिराने ती सहजपणे विकत घेतली. (स्थानिक प्रतिनिधी) पाठ थोपटून घेण्यासाठी फौजदाराचा खोटरडेपणायापूर्वी तीन चोरट्यांना अटक करून स्थानिक गुन्हे शाखेतील एका फौजदाराने त्यांच्याकडून जबरी चोरीतील १० ते १२ घटनांची कबुली घेतल्याचे रेकॉर्ड तयार केले. त्या रेकॉर्डमध्ये निमोदिया यांच्याकडील चोरीचाही समावेश होता. सद्या संबंधित चोरटे वडगाव रोड पोलिसांच्या ताब्यात आहे. ते शहर पोलिसांच्या ताब्यात येण्यापूर्वीच भलत्याच विधी संघर्ष बालकांकडून या चोरीची कबुली आणि ऐवज जप्त झाला. केवळ वरिष्ठांकडून पाठ थोपटून घेण्यासाठी त्या फौजदाराने हा अधाशीपणा केल्याची ओरड खुद्द पोलिसातूनच होेत आहे.