शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षाच्या चिमुकलीला कवटाळून शिक्षकेची विहिरीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

कोमल उमेश उलमाले (वय ३५)  व श्रुती वय (दीड वर्ष) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. येथील विश्रामगृह परिसरात त्यांचे वास्तव्य होते. १९ मार्च चे रात्री ८ वाजताच्या दरम्यान पती उमेश, दोन मुली, सासू-सासरे यांनी एकत्र जेवण केले. थोड्या वेळाने  कुटुंबातील सर्व मंडळी आपआपल्या खोलीत झोपी गेल्यानंतर कोमलने दीड वर्षाच्या श्रृती नामक लहान मुलीसह मागच्या दारातून घर सोडले.

ठळक मुद्देविहिरीवर तरंगली दुधाची बाटली

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : येथील कॉन्व्हेंटला शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या विवाहितेने दीड वर्षाच्या चिमुकलीसह आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मृतक १९ मार्च रोजी रात्री जेवण आटोपल्यावर घरची मंडळी झोपली असताना बेपत्ता झाल्या होत्या. शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घराशेजारी असलेल्या विहिरीत मायलेकी मृत अवस्थेत आढळून आल्या.  कोमल उमेश उलमाले (वय ३५)  व श्रुती वय (दीड वर्ष) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. येथील विश्रामगृह परिसरात त्यांचे वास्तव्य होते. १९ मार्च चे रात्री ८ वाजताच्या दरम्यान पती उमेश, दोन मुली, सासू-सासरे यांनी एकत्र जेवण केले. थोड्या वेळाने  कुटुंबातील सर्व मंडळी आपआपल्या खोलीत झोपी गेल्यानंतर कोमलने दीड वर्षाच्या श्रृती नामक लहान मुलीसह मागच्या दारातून घर सोडले.  घरून जाताना कोमलने लहान मुलीला दूध पाजण्यासाठी दुधाची बॉटल सोबत घेतली. ११ वाजताच्या दरम्यान, पत्नी व लहान मुलगी घरी नसल्याचे पतीला लक्षात आले. याची माहिती कुटुंबीयांसह शेजाऱ्यांना व नातेवाइकांना देण्यात आली. सगळ्यांनी रात्री शोध घेतला; परंतु कोमल कुठेही आढळून आली नाही. शनिवारी, २० मार्च रोजी सकाळी साडे सात वाजता कोमलचे पती उमेश उत्तम उलमाले  यांनी पत्नी हरविल्याची तक्रार पोलिसात केली. शोधाशोध सुरू असताना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान, घराशेजारील नीलेश थेरे यांच्या शेतातील विहिरीत दुधाची बॉटल व चपला पाण्यावर तरंगत असल्याची माहिती मिळाली. पाण्यात गळ टाकून शोध घेतला असता कोमल व श्रुती एकमेकींना कवटाळून  मृत अवस्थेत आढळून आल्या.  घटनेचा पुढील तपास ठाणेदार जगदीश मंडलवार करीत आहेत.

विहिरीवर तरंगली दुधाची बाटली  कोमलने दीड वर्षाच्या श्रृतीसह विहिरीत उडी घेतली. दोघीही मायलेकी बुडाल्यानंतर लहानग्या श्रृतीच्या दुधाची बाटली तरंगत राहिली. ती बाटली पाहूनच लोकांच्या निदर्शनास हा आत्महत्येचा प्रकार आला. या घटनेने खळबळ उडाली. 

 

टॅग्स :Deathमृत्यूTeacherशिक्षक