भक्तांना ऊर्जा देणारे ‘तपोनेश्वर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:00:38+5:30

या मंदिराचे अनेक वैशिष्ट्य पहायला मिळतात. याची रचना अखंड दगडांपासून करण्यात आली आहे. आतील बाजूने त्यावर सुंदर कलाकु सर आहे. त्यावर देवी, देवता आणि विविध कलाकृती पहायला मिळतात. या मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर नंदीची सुबक मूर्ती आहे. या मूर्तीचे खास वैशिष्ट्य आहे. नंदीवर हाताने थाप मारताच त्यातून प्रतिध्वनी कंपित होतो.

'Taponeshwar' which gives energy to devotees | भक्तांना ऊर्जा देणारे ‘तपोनेश्वर’

भक्तांना ऊर्जा देणारे ‘तपोनेश्वर’

ठळक मुद्देप्रतिध्वनी येणारा नंदी : पुरातत्त्व विभागाकडे देखरेखीची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील शिवालयं भक्तांना मोहित करणारे आहेत. प्रत्येक मंदिराची अद्भूत कलाकृती आहे. दारव्हा तालुक्यातील तपोनेश्वर हे त्यातीलच एक आहे. श्रावण महिना कोरोनाच्या सावटात आहे. यामुळे मंदिरात शिवभक्तांची गर्दी नाही. मात्र मनात शिवनामाचा अखंड जप सुरू आहे. विदर्भाच्या विविध भागातील भक्त याठिकाणी दर्शनाला येतात.
तपोनेश्वरचे मंदिर पूर्वी घनदाट जंगलात होते. आता या ठिकाणी मानवी वस्ती आहे. मुख्य रस्त्यापासून आतमध्ये हे मंदिर आहे. सर्वच मंदिराची एकसारखी कलाकृती आहे. पुरातत्व विभागाने हे मंदिर आपल्या देखरेखीत घेतले आहे.
या मंदिराचे अनेक वैशिष्ट्य पहायला मिळतात. याची रचना अखंड दगडांपासून करण्यात आली आहे. आतील बाजूने त्यावर सुंदर कलाकु सर आहे. त्यावर देवी, देवता आणि विविध कलाकृती पहायला मिळतात. या मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेर नंदीची सुबक मूर्ती आहे. या मूर्तीचे खास वैशिष्ट्य आहे. नंदीवर हाताने थाप मारताच त्यातून प्रतिध्वनी कंपित होतो.
शिवालयाच्या बाजूला जलकुंड आहे. जलकुंडातील पाणी वाढताच शिवालयातील मूर्ती जलमय होते. कितीही पाणी बाहेर काढले तरी या ठिकाणी पुन्हा संचय होतो. अशी अद्भूत रचना त्या काळात करण्यात आली आहे. शिवालयात एक कक्ष निर्माण केलेला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीला सहज बसता येईल, अशी संपूर्ण व्यवस्था आहे.
शिवालयाच्या बाजूला आजही चिरेदार शिळा पहायला मिळतात. या ठिकाणी वर्षभर भक्तांची गर्दी पहायला मिळते. श्रावणात भक्तांची प्रचंड वर्दळ परिसरात असते. यात्रेचे स्वरूप या ठिकाणी असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे अनेक बंधन आहेत.

Web Title: 'Taponeshwar' which gives energy to devotees