न्यायप्रिय राजा रावणाचे दहन बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:20+5:30

निवेदनात म्हटले की, महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारशाचा अविस्मरणीय ठेवा आहे. महात्मा राजा रावण हे विविध गुणांचा समुच्चय आहे. अशा महान राजाला वर्णांध व्यवस्थेने बदनाम केले आहे. परंतु, आदिवासी व इतरही समाजातील संशोधक, साहित्यिक यांनी महात्मा राजा रावण यांचा खरा इतिहास शोधून काढला.

Stop the burning of righteous King Ravana | न्यायप्रिय राजा रावणाचे दहन बंद करा

न्यायप्रिय राजा रावणाचे दहन बंद करा

Next
ठळक मुद्देबिरसा क्रांतिदल : जिल्हाधिकारी, एसपींना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : न्यायप्रिय राजा रावण यांचे दसऱ्याचे दिवशी काही लोक दहन करतात. हे दहन तत्काळ बंद करण्यात यावे, तसेच या कृतीला परवानगी देवू नये, अशी मागणी बिरसा क्रांतिदलाने केली असून याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की, महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारशाचा अविस्मरणीय ठेवा आहे. महात्मा राजा रावण हे विविध गुणांचा समुच्चय आहे. अशा महान राजाला वर्णांध व्यवस्थेने बदनाम केले आहे. परंतु, आदिवासी व इतरही समाजातील संशोधक, साहित्यिक यांनी महात्मा राजा रावण यांचा खरा इतिहास शोधून काढला. म्हणून रावण दहन करण्याची परवानगी कोणालाही देण्यात येवू नये. ही प्रथाच बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दसºयाच्या दिवशी रावण दहन करण्याचा प्रयत्न केला तर सर्व आदिवासी समाजाकडून निषेध करण्यात येईल. अशा लोकांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तसेच भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत, मुंबई पोलीस अ‍ॅक्टनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे. निवेदन देतेवेळी बिरसा क्रांती दलाचे महासचिव प्रमोद घोडाम, प्रा. कैलास बोके, प्रफुल्ल कोवे, शरद चांदेकर, गणेश फुपरे, संजय मडावी, शिवनारायण भोरकडे, अतुल कोवे, रमेश मडावी, संतोष कन्हाके, रामेश्वर ढगे, कृष्णा आडे, भगवान मसराम, एम. के. कोडापे, मनिषा तिरणकर, सोनल परचाके आदी उपस्थित होते.

Web Title: Stop the burning of righteous King Ravana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस