शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचारी पगारासाठी ठोठावणार लोकप्रतिनिधींचे दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 05:00 IST

कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असताना निर्धारित तारखेला वेतन दिले जात नाही. दिवाळी सणापूर्वी दोन महिन्यांचे थकीत वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी यासाठी कामगार संघटनेतर्फे सर्व पातळींवर निवेदन देणार आहेत. २ नोव्हेंबरला निवेदन दिल्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ९ नोव्हेंबर रोजी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर सहकुटुंब आक्रोश करणार आहेत.

ठळक मुद्देकामगार संघटनेचे नेतृत्त्व क २ नोव्हेंबरचा मुहूर्त, प्रशासनालाही हलविणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाने पगाराचे वांदे करून ठेवल्याने एसटी कर्मचारी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. मागील आठ महिन्यांपासून त्यांना अनियमित वेतनाला सामोरे जावे लागत आहे. अखेर त्यांनी पगार आणि इतर आर्थिक प्रश्न निकाली निघावे यासाठी लोकप्रतिनिधींचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. २ नोव्हेंबर रोजी कामगार संघटनेच्या नेतृत्त्वात हे कर्मचारी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देणार आहेत.कोरोना विषाणूच्या महामारीतही जीवाची बाजी लावून रात्रंदिवस काम करत असतानाही या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर दिला जात नाही. अनेक कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले. ७३ जणांचा मृत्यू झाला. या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या बहुतांश कुटुंबाला विमा कवचाची ५० लाखांची मदत प्रशासनाने दिलेली नाही. प्रतिकूल परिस्थितीत काम करत असतानाही ऑगस्टपासूनचे वेतन दिले नाही. सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या काही कामगारांचे रजा कालावधीचे वेतन कापले. या सर्व बाबीमुळे कर्मचारीवर्ग हतबल झाला आहे.ऑक्टोबरच्या वेतनाची तारीख जवळ येवूनही ऑगस्ट, सप्टेंबरचे पगार झालेले नाही. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव पाच टक्के महागाई भत्ताही लागू करण्यात आलेला नाही. महागाई भत्त्याची सन २०१८ मधील दोन टक्के तीन महिन्यांची थकबाकी तसेच २०१९ मधील तीन टक्क्याची नऊ महिन्यांची थकबाकी महामंडळाने या कर्मचाऱ्यांना दिली नाही.कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची असताना निर्धारित तारखेला वेतन दिले जात नाही. दिवाळी सणापूर्वी दोन महिन्यांचे थकीत वेतन, महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी यासाठी कामगार संघटनेतर्फे सर्व पातळींवर निवेदन देणार आहेत. २ नोव्हेंबरला निवेदन दिल्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ९ नोव्हेंबर रोजी लोकप्रतिनिधींच्या घरासमोर सहकुटुंब आक्रोश करणार आहेत. या सर्व बाबी एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे आणि अध्यक्ष संदीप शिंदे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.शासनाने महामंडळाला निधी द्यावाकोरोना या वैश्विक महामारीमध्ये एसटी कर्मचारी जीवाची पर्वा न करता प्रवाशांना सेवा देत आहेत. अशा कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांची ही दिवाळी अंधारात जावू नये. याकरिता शासनाने एसटी महामंडळाला निधी देवून कामगारांचे आर्थिक प्रश्न निकाली काढावे, असे कामगार संघटनेचे केंद्रीय प्रसिद्धी व औद्योगिक संबंध सचिव सदाशिव शिवनकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :state transportएसटी